शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2015 01:22 IST

ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे.

मागणीकडे दुर्लक्ष : ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचा प्रतापआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.माजी पंचायत समिती सदस्य जियालाल पंधरे, किशोर रहांगडाले वळद व अनेक शेतकऱ्यांनी १० डिसेंबर २०१४ ला कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी लघु पाटबंधारे विभाग देवरी यांच्या मार्फत लेखी निवेदन देऊन कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. या कालव्याद्वारे वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीसाठी पाण्याची मागणी करण्यात आली. मात्र धरणात साठा कमी असल्याच्या सबबीवर पाणी देण्यात आले नाही. उन्हाळ्यात कालव्याला आठ दिवसातून एकदा पाणी सोडले असते तर पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली नसती. उलट ओवारा प्रकल्पाचे पाणी तेलीटोला, कारुटोला, हेटी, कवडी, हरदोली, सातगाव या गावांना रबी करिता पाणी सोडण्यात आले, अशी अधिकारी भेदभावपूर्ण वागणूक करीत आहे. धरणात पाणी नाही म्हणून वेळकाढू धोरण अंगिकारुन कामचुकारपणा करीत आहेत. सध्या धरणात ३३५.४०० लेव्हल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. कमीत कमी दीड मिटर पाणी काढला तरी धरणात पाणी राहू शकतो. ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडले तर पाण्याची पातळी वर येईल व विहिर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणी समस्या दूर होईल. तसेच कालव्याच्या पाण्यामुळे जी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती आहे ती थांबेल. सगळ्याच पक्षांचे आमदार या क्षेत्रातून निवडून गेले. मात्र पाणी समस्येवर कोणी ठोस तोडगा कोणी काढला नाही, अशी प्रतिक्रिया जियालाल पंधरे यांनी व्यक्त करुन कार्यकारी अभियंता गोंदिया, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता सूर्यवंशी, मध्यम प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. जर समस्या लक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर ओवारा धरणावर ठिय्या आंदोलनाचा इशारा जियालाल पंधरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)