शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नवोपक्रमामुळे करटी केंद्र प्रकाशझोतात

By admin | Updated: December 31, 2016 01:33 IST

तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या करटी (बु.) केंद्राच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे या केंद्रांतर्गत जिल्हा

प्रगतीकडे वाटचाल : केंद्रप्रमुख, विषयशिक्षक घेताहेत मेहनत हुपराज जमईवार ल्ल परसवाडा तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या करटी (बु.) केंद्राच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे या केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढत आहे. केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या नवोपक्रमशिल कल्पनांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रकडे केंद्राची वाटचाल सुरू आहे. करटी बु. केंद्रांतर्गत उच्च प्राथमिक शाळा ६ व प्राथमिक ४ मिळून एकूण १० शाळा आहेत. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये संपूर्ण करटी बु. केंद्र १०० टक्के प्रगत करण्याच्या अनुषंगाने त्यांनी २५ निकषांच्या अनुषंगाने केंद्रस्तरीय विषय शिक्षकांचे पथक तयार केले. या पथकामध्ये नवनियुक्त विषय शिक्षक जयंत डहाटे (बेरडीपार), दिलीप हिरापुरे (बिहिरीया), लच्छू ढबाले (बिहीरीया), संतोष ठाकरे (डब्बेटोला), डब्ल्यू. व्ही. न्यायकरे (पालडोंगरी), विजय भगत (जमुनिया), कविता चिंचमलातपुरे (इंदोरा बु.) यांचा समावेश करण्यात आला. पथकाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत २५ निकषांच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका केंद्रप्रमुख घोष यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली. पथकामार्फत केंद्रांतर्गत सर्व १० शाळांचे मुल्यांकन केले. हे मुल्यांकन वस्तुनिष्ठ करण्यात आले. शाळा तपासणीमध्ये केंद्रप्रमुख घोष यांनी स्वत: प्रत्यक्ष सहभाग घेतला. शिक्षण परिषदेमध्ये शाळांमध्ये असलेल्या उणिवा व त्रुटी यावर पथकामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व बाबींची दखल घेत तिरोडाचे गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी सर्व केंद्र प्रमुखांना उपक्रम राबविण्यासाठी सूचनाही दिल्या आणि हळूहळू जिल्हास्तरावर या उपक्रमाची दखल घेतली जात आहे. केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांनी गुणवत्तेचा ध्यास घेत वर्गनिहाय प्रश्नपत्रिका काढून व विविध नवोपक्रम राबवून आपला वर्ग व शाळा प्रगत करण्याचा ध्यास घेतला. पालकवर्गातूनही याकरिता सहभाग मिळत आहे. असे राबविले जाताहेत उपक्रम ४केंद्रप्रमुख आर.बी. घोष यांच्या प्रेरणेतून केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी २५ निकषांनुसार पुस्तकाचे वाचन करुन प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रिया अधिक चांगली, परिणामकारक केली. या केंद्रांतर्गत येणाऱ्या दहाही शाळांमध्ये ‘सुंदर मी होणार, दिनांकानुसार इंग्रजी शब्दार्थ, माझा वाढदिवस, स्वच्छ शाळा-सुंदर शाळा, नमस्कार घालणे, गणितीय खेळ, दिनांकानुसार पाढा, कानाने ऐकूया-पेनाने लिहू या, चला नाटक करुया, चिठ्ठी उचलून बोलूया, बालसभेचे आयोजन, कौन बनेगा ज्ञानपती’ असे विविध नवोपक्रम सुरू केले. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत संपूर्ण केंद्र प्रगत घोषित करण्याचा संकल्प केंद्रप्रमुखांसह सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतला.