कडब्याचा पत्ताच नाही : यंदा सोयाबीनचे उत्पादन घसरल्याने कुटारही महागणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यात ज्वारीचे पीक हे बोटावर मोजण्याइतपत घेतले जाते. ज्वारीपासून मिळणारा हिरवा चारा आणि वाळल्यावर मिळणारा कडबा दोन्ही जनावरांसाठी पौष्टिक असते. पण लागवडच नसल्याने कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. रोख पिकाच्या हव्यासापोटी ज्वारीच्या पेरण्यात कमालीची घट झाली आहे. सोयाबीनचे कुटारही नाही.यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाले. सोयाबीनचा उपयोग हिरवा चारा म्हणून होत नसला तरी कुटार म्हणून वाळलेल्या सोयाबीनचा उपयोग होतो. मात्र शेतकऱ्यांनी उत्पन्न होत नसल्याच्या कारणाने त्यावर ट्रॅक्टर चालविल्याने यंदा तेही मिळीणे कठीण झाले आहे. येत्या उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. जमिनीचा दर्जा घसरण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे जमिनीचा दर्जा घसरण्याची भीती आहे. शिवाय त्याचा जनावरांसोबत मानवी जीवनावरही त्याचे दुरगामी परिणाम दिसू लागले आहेत. ही औषधे काही प्रमाणात मानवांच्याही पोटात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. ग्रामीण भागात अलिकडे शेतीच्या कामासाठी मजुरच मिळत नसल्याची ओरड होत आहे. मजुरीचे दर वधारल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे मजुरांना कामी न लावता सरळ एक रोजदार सांगून तणनाशकाची फवारणी केली जात आहे. या कारणाने हिरवे गवत संपुष्ठात येत असल्याने चाराप्रश्न गंभीर बनत चालला आहे. शेताच्या धुऱ्यावर तसेच पिकांच्या मध्यभागी उगविलेल गवत निंदण करून कापले जात होते. ते कापलेले गवत कधी चारा म्हणून वापरले जात होते. मात्र मजुरी वाढल्याने निंदणाचा खर्च परवडणारा नाही. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तणनाशकाचा वापर करणे सुरू केले आहे. यामुळे ही हिरवळ मोठी होण्याअगोदरच करपून जाते. यामुळे जनावरांना हिरव्या चाऱ्यापासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यात जनावरांचा हिरवा चारा हिरावला जात आहे. तणनाशकाच्या अतिरिक्त वापरावर वेळीच निर्बंध घालून हिरवळ जोपासने गरजेचे झाले आहे. शेत-शिवारात धुऱ्या बांधावर व मोकळ्या जागेत पिकासोबत तण वाढते. परिणामी रोपे रोगग्रस्त होवून उत्पादनात घट होते. त्यामुळे त्याचे निंदन करणे गरजेचे असते. मजुराद्वारे शेतातील तण निंदन करून काढल्यास धुऱ्या बांधावरील व मोकळ्या जागेतील गवत जनावराकरिता पौष्टिक वैरण म्हणून वापरले जाणे शक्य होते. परंतु सध्या मजुरांचे दर वाढले आहे. तसेच प्रत्येकाकडे जनावरे नाहीत. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची गरज नसल्याने, तसेच हे हिरवे कुरण दुसऱ्यास उपयोगी पडेल ही भावना लोप पावत चालल्याने शेतकरी सरसकट तणनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे तणासहीत हिरवे गवतही जळून जाते. (प्रतिनिधी)तणनाशकांनी इतर वनस्पतीही जळून खाकसध्याची तणनाशके ही महागडी असून प्रभावी व जहाल आहे. फवारणीनंतर काही तासातच याचा प्रभाव दिसून येतो. फवारणीच्या जागेशिवाय आजुबाजुच्या जागेवरील गवत व इतर वनस्पतीही जळून खाक होताना दिसते. यामुळे पावसाळा आणि हिवाळा असा सात ते आठ मिहने जनावरांना पुरेल असा हिरवा आणि दुधाळ जनावरांसाठी पौष्टिक चारा अल्पावधीतच संपुष्टात येत आहे. जनावरांच्या हक्काचे वैरण अल्पावधीतच नाहीसे होत असल्याने पशुपालकासमोर गुराच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे जिल्ह्यात पशुधन विक्र ी वाढत आहे.वैरण टंचाईमुळे शेतकऱ्याचा जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय डबघाईस आला असून दुधाची टंचाई जाणवत आहे.
तणनाशकाच्या वापराने हिरवा चारा संपुष्टात
By admin | Updated: December 21, 2015 01:55 IST