शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे गावाच्या विकासात अडथळा

By admin | Updated: May 15, 2015 00:50 IST

लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. मात्र स्थानिक प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. सध्या बारव्हा गावात काही नागरिकांनी ये जा करण्याच्या मार्गावर अतिक्रमण करून रस्ते पूर्णत: गडप केले आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांच्या निगडीत गरजा पूर्ण करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची नेमणूक केली आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व विकासकामे आदी समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतला प्राधान्य आहे. मात्र या अधिकाराची जाणीव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना नसल्यामुळे या सोयी पासून गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. बारव्हा येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये ग्रामपंचायतच्या आबादी जागेत गरजू लोकांना मोफत घरकुल निर्माण करून देण्यात आले. त्यामध्ये १५ फुटाचे रस्ते सोडून बेघर वस्तीचे घरकुल तयार करण्यात आले. मात्र काही लोकांनी शासकीय जागेचा दुरुपयोग केला आणि या १५ फुटाचे रस्ते अतिक्रमणामुळे ५ फुटाचे शिल्लक आहेत. या सर्वसाधारण रस्त्याची रुंदी १५ फुट इतकी असते. मात्र अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी फक्त ३ ते ५ फुटापर्यंत राहिली आहे.अतिक्रमण होत असताना काही नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि वेळोवेळी लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. मात्र रस्ते अरुंद झाल्यामुळे बैलबंडी, ट्रॅक्टर सारखे वाहन घरापर्यंत नेता येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विशेषत: शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना लेखी पत्र देवून होत असलेल्या आणि झालेल्या अतिक्रमणाची माहिती दिली आणि कारवाईची मागणी केली. त्यानुसार खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखांदूर आणि ग्रामसेवक बारव्हा यांना संबंधित अतिक्रमणाची चौकशी करून अतिक्रमण काढणे या संबंधाने ठराव देऊन कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. परंतु त्यांच्या आदेशाची दखल न घेता त्यांच्या आदेशाची खिल्ली उडविली जात आहे. गावात काही रस्त्यावर सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले. सदर रस्ता हा ३ मिटर रुंद (म्हणजे १० फुट) इतका तयार करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील अतिक्रमण काढता येत होते. परंतु प्रशासनाला गावातीलच कोणते रस्ते किती फुट रुंद आहेत हे सुद्धा माहित नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या गावाच्या विकास खुंटत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ते अतिक्रमणमुक्त करून द्यावे अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)