शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने जलस्तर कायम

By admin | Updated: August 23, 2015 00:08 IST

मागील पाच वर्षाच्या तुलनेत सन २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पातळीला तारण्यात आले.

गोंदिया : मागील पाच वर्षाच्या तुलनेत सन २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पातळीला तारण्यात आले. मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पाण्याची पातळी सरासरीच्या तुलनेत कमी झालेली नाही. मागील पाच वर्षाच्या तुलनेत ०.१ मीटरने पाण्याची पातळी वर आली आहे.पाण्याचा वापर वाढल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी दरवर्षीपेक्षा एक मीटरने खोल जाणे अपेक्षित होते. परंतु सन २०१४ च्या जून ते सप्टेंबरदरम्यानही वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस पडला. त्यानंतर सन २०१५ च्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याची पातळी जमिनीच्या खोल गेली नाही. मागील पाच वर्षात जमिनीच्या पृष्ठभागापासून ८.५५ मीटर खोल पाण्याची पातळी होती. यावर्षी ती पातळी ८.५४ असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली आहे. शेतीचे सिंचन करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतीतही जवाहर विहीरींचा लाभ घेऊन त्या ठिकाणी बोअर करून आपल्या शेतीला सिंचन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निश्चितच पाण्याची पातळी खोल जात आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाण्याची पातळी खोल गेली नाही. अकाली पावसामुळे पाण्याचा वापरही कमी झाला. तसेच गोळा झालेले पाणी जमिनीत मुरले. जिल्ह्याची मागील पाच वर्षाची भूजलपातळी ८.५५ होती. यावर्षी ८.५४ मीटर आहे. (तालुका प्रतिनिधी)विहिरी, बोअरमधील पाण्याची पातळी खालावलीजमिनीतील पाण्याची कायम असल्याचे भूवैज्ञानिक सांगत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, बोअरला पाहीजे तसे पाणीच नाही. सध्या पावसाअभावी काही शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. बोअरमधील पाण्याने पाणी देण्याचा प्रयोग शेतकरी करीत असले तरी त्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती आहे. तरीही सरकारी यंत्रणा जमिनीतील पाण्याची पातळी कायम असल्याचे सांगत असल्यामुळे ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे. यावर्षी अजून सरासरीच्या तुलनेत बराच कमी पाऊस बरसला आहे. आता पावसाचा जेमतेम एक महिना शिल्लक आहे. या दिवसात पाऊस न झाल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना पिक घेणे कठीण होणार आहे.जलस्तर वाढविण्यासाठी विविध योजनाजमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शासनाचे जुने धोरण पाणी अडवा, पाणी जिरवा कायम आहे. त्याचबरोबर पाण्याच्या पुनर्भरणाच्या पध्दती, रेन वॉटर हार्वेस्टींग, जलयुक्त शिवार अभियान, सिमेंट बंधारे, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, साठवण बंधारे तयार करण्यात येतात. यामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविण्यास हे घटक महत्वाचे ठरत आहेत.