शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धरणे तहानलेलीच

By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST

जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील

गोंदिया : जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील ही धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. पावसाळा मधोमध असतानाही ही धरणे अर्धीच भरल्याची नोंद आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर यावर्षी रबी हंगामात पाण्याला पुरेशा पाण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यात चार मोठ्या धरणांसह, १० मध्यम प्रकल्प, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्याला या पाणी पुरवठा व शेतीसाठी सर्वांचाच आधार घ्यावा लागतो. यात प्रमुख सहभाग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह, देवरी तालुक्यातील सिरपूर, आमगाव तालुक्यातील पुजारीलोटा व कालीसराड यांचा आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी या चार धरणांत पुरेपूर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यंदा पावसाळा अर्धा लोटून गेला असून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नसल्याने ही धरणे अर्धीच भरलेली आहेत. आकडेवारीनुसार बघितल्यास, इटियाडोह धरणात आज ४७.६५ टक्के पाणीसाठा असून मागील याच धरणात ६५.२३ टक्के पाणीसाठा होता. सिरपूर धरणात ५७.२९ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ७०.४४ टक्के पाणीसाठी होता. पूजारीटोला धरणात ५६.०२ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ५३.५८ टक्के तर कालीसराड धरणात ५१.४२ टक्के पाणीसाठी मागील वर्षी ५७.५१ टक्के पाणीसाठी होता. वरील आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठी कमीच आहे. मागील वर्षी धरणांमध्ये असलेल्या भरपूर पाणीसाठ्यामुळे याच प्रकल्पांमधून जिल्हाला पाणी पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे रबीच्या हंगामातही पाटबंधारे विभागाने शेतीला सिंचनासाठी पुरेपूर पाणी दिले होते. शिवाय मध्यम प्रकल्पांची स्थिती बघितल्यास, बोदलकसा मध्यम प्रकल्पात ८०.१२ टक्के, चोरखमारा ५१.०३ टक्के, चुलबंद ८६.८९ टक्के, खैरबंधा ४४.३७ टक्के, मानागड ८१.९८ टक्के, रेंगेपार ७४.४५ टक्के, संग्रामपूर ६६.८६ टक्के पाणीसाठी असून उमरझरी, कटंगी व कलपाथरी मध्यम प्रकल्पांत पुरेपुर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारली असून यातील मोजकेच पाण्याने तुडूंब भरले आहेत. तर उर्वरीत अद्याप अर्ध्यावरच अडकले असून त्यांची तहान भागलेली नसल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)