शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

बागेत पडणार ‘कोरड’

By admin | Updated: February 27, 2016 02:03 IST

येथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे.

कपिल केकत गोंदियायेथील सुभाष बागेतील एक विहीर व एकमात्र बोअरवेल बंद पडल्याने पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. आता दुसऱ्या विहीरीने काम कसे-बसे निघत असले तरी उन्हाळ््यात ती विहीरही आटते. अशात मात्र बागेत ‘कोरड’ पडणार व झाडांना पाणी देणे संभव होणार नाही. करिता प्रभारी बगिचा निरीक्षकांनी एका बोअरवेलची मागणी केली आहे. मागील वर्षापासून ते यासाठी पत्र देत असून आतापर्यंत बोअरवेल मिळालेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा बागेसाठी भारी जाणार असल्याचे दिसते. शहरात आज फक्त सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. दिवसभर कामाच्या थकव्यानंतर झाडांच्या सावलीत बसून निवांत वेळ घालविण्यासाठी वृद्धांपासून तरूण मंडळीही बागेत येते. हिरव्यागार झाडांच्या सावलीत बसून आपला काही वेळ घालविण्यासाठी शहरवासीयांची बागेत गर्दी होते. शहरातील एकच बाग असल्याने चिमुकल्यांचीही येथील खेळणे व हिरवळीवर खेळण्यासाठी गर्दी असते. अवघ्या शहरातील नागरिकांची बागेकडेच धाव असते. त्यातही आता उन्हाळ््यात शाळांच्या सुट्या लागल्यानंतर चिमुकल्यांसह पालकही बागेत येतात व बागेत पाय ठेवायला जागा उरत नाही. या बागेतील हिरवळीसाठी बागेत दोन विहिरी व एक बोअरवेल आहे. यातील एक विहीर पूर्णपणे आटलेली असून दुसऱ्या विहिरीवरूनच सध्या झाडांना पाणी दिले जात आहे. मात्र उन्हाळ््यात ही विहीरही आटते. शिवाय बोअरवेल बंद पडले असून पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार बोअरवेल बुजले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावे कसे अशा प्रश्न सध्या बगिचा प्रशासनापुढे उभा आहे. पाण्याची ही समस्या सुटावी यासाठी प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी नगर परिषदेकडे एका बोअरवेलची मागणी केली आहे. दुसरी विहीरही आटल्यास बोअरवेलद्वारे पाणी देता येईल असा त्यांचा या मागचा हेतू आहे. मात्र त्यांच्या मागणीवर अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. एक बोअरवेल मिळाल्यास बागेतील पाण्याची समस्या सुटणार. मात्र अशा या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. झाडांना पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली बागेतील झाडांना पाणी पुरवठा करता यावा यासाठी बागेत पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. हे झाले असले तरीही बोअरवेल नसल्यास पाणी देणार कोठून, असा प्रश्न बागिचा प्रशासनापुढे उभा आहे. यंदा कसे करूनही बोअरवेल गरजेची झाली आहे. अन्यथा झाडांना पाणी पुरवठा करता येणार नाही. अशात पाईपलाईनसाठी करण्यात आलेला लाखो रूपयांचा खर्च मात्र व्यर्थ जाणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मागील वर्षापासून देताहेत पत्रप्रभारी बगिचा निरीक्षक मिश्रा यांनी या गंभीर बाबीला लक्षात घेत मागील वर्षीही नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून बोअरवेलच्या विषयावर निर्णय घेण्यात आलेला नाही. बागेला बोअरवेल मंजूर झाल्यास उन्हाळ््यात बागेत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या सुटणार. तसेच झाडांना पाणी देण्याची व्यवस्था होणार. करिता त्यांची या बोअरवेलसाठी धडपड सुरू आहे. आता कधी पदाधिकारी व अधिकरी मेहरबान होतात हे बघायचे आहे.