शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वडेगावचे औषधी प्रकरण दडपले?

By admin | Updated: May 29, 2015 01:19 IST

तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता उघड्यावर मिळालेला औषध साठा प्रकरण आरोग्य विभागाने दडपले आहे.

महिना लोटला : अहवालच मिळाला नाहीगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता उघड्यावर मिळालेला औषध साठा प्रकरण आरोग्य विभागाने दडपले आहे. या प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी तालुका पासून जिल्हास्तरावरील आरोग्य विभागातील अधिकारी लागले आहेत. १४ एप्रिल रोजी वडेगाव येथे शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणारे वीटामीन ए (अ जीवनसत्वाच्या) औषधी व बालकांसाठी असलेल्या जंतनाशक औषधी उघड्यावर फेकण्यात आल्या होत्या. या संदर्भात दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तिरोडाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. आर. टेंभूर्णे यांना दिले. डॉ. टेंभूर्णे यांच्या कार्यक्षेत्रातील हे प्रकरण असल्याने सत्यता ते कसे पुढे आणणार? त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील वरिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यायला हवे होते. असा आक्षेप बातम्यातून घेतल्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणासाठी दोन सदस्यीय चमू जिल्हा स्तरावरून नियुक्त केली. परंतु त्या चमूनेही स्वत: चौकशी न करता तालुका वैद्यकीय अहवाल देतील व तेथील वैद्यकीय अधिकारी अहवाल दिल्यावर पुढची दिशा ठरवू अश्या आशेवर ते राहीले. या प्रकरणाला महिनाभराचा कालावधी लोटला असतानाही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हा स्तरीय चमूने स्वत: पाहणी केली नाही. ते तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालाची वाट पाहत होते त्या दोघांचा अहवाल न दिल्यामुळे चमूची चौकशी जशीच्या तशीच आहे. बालकांना देण्यात येणारे औषध उघड्यावर फेकण्यात येते मात्र त्या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्य विभाग घेत नाही यामुळे या प्रकरणी तर्कवितर्क लावले जात आहे.वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला सन २०१३-१४ या वर्षात आॅक्टोंबर महिन्यात अल्बेनेझोल ही जंतनाशक व अ जीवनसत्वाच्या औषधीचा साठा पुरविण्यात आला. वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने लाखेगाव, मुरमाडी, कोयलारी, वडेगाव, नवेझरी, कोडेलोहारा या सहा उपकेंद्रांना या औषध पुरविल्या गेल्या. याच परिसरात ही औषध आढळली आहे. जिल्हा स्तरीय चौकशी समितीने वडेगाव येथील औषध साठ्याची चौकशी अद्याप केली नाही. या औषधातील विटामीन ‘ए’चा बॅच नंबर वडेगाव आरोग्य केंद्राचा असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. आर टेंभूर्णे यांनी सांगितले होते. (तालुका प्रतिनिधी)टीएमओ म्हणतात, वैद्यकीय अधिकारी दोषीत्या आरोग्य केंद्रातील औषधांचा साठा रजिस्टरप्रमाणे बरोबर आहे. मात्र ही औषधी मिळाल्यावर तेथील डॉ.महेंद्र धनविजय यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसात करायला हवी होती. त्या औषधीचा पंचनामा करायला हवा होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर त्या ठिकाणची औषधी उचलण्यात आली. यामुळे या प्रकरणाला दडपण्याचे डॉ.धनविजय यांनी प्रयत्न केल्याचे व यात ते दोषी असल्याचे तिरोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे यांनी सांगितले.