शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: September 2, 2014 23:51 IST

जिल्ह्यात पावसाची आवश्यकता असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

गोंदिया : जिल्ह्यात पावसाची आवश्यकता असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. रोवण्या आटोपल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यावर्षी पीक होणार नाही व आपण पुन्हा कर्जबाजारी होणार, या चिंतेने त्यांना त्रस्त करून टाकले होते. मात्र सोमवारी आलेल्या पावसाने ते सुखावले. सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस थोड्याफार प्रमाणात रात्रभर सुरू राहिला. हा पाऊस जिल्ह्यात कुठे अधिक तर कुठे कमी प्रमाणात होता. तरीसुद्धा रात्रभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाने वातावरणात बदल झाला आहे. त्यासाठी काही श्रद्धाळू शेतकऱ्यांनी भगवान श्रीगणेशांचे आभार मानले.मागील २४ तासात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये १५८.५ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. त्याची सरासरी १९.८ मिमी आहे. २ सप्टेंबरला सकाळी आठ वाजतापर्यंत जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यात २७.६ मिमी, गोरेगावात ८ मिमी, तिरोडा येथे ३९, अर्जुनी/मोरगावात २५ मिमी, देवरी येथे १२ मिमी, आमगाव येथे १८.४ मिमी, सालेकसा येथे २० मिमी व सडक/अर्जुनी तालुक्यात ८.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मंगळवारीसुद्धा दिवसभर आकाश ढगाळलेले होते. या पावसामुळे शेतात काही प्रमाणात पाणी जमा झाले आहे. त्यानंतर सिंचनासाठी कालव्यांमधून सोडलेले पाणी काही दिवसांपर्यंत थांबविले जावू शकते.