शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळसदृश परिस्थिती कायम

By admin | Updated: September 17, 2015 02:14 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त : पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणारशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मागील पंधरवड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात शेंडा, मसरामटोला, आबकारीटोला, मोहघाटा, उशिखेडा, पाटीलटोला, कन्हारपायली, सालईटोला, पांढरवानी, कोयलारी, प्रधानटोला, कोहळीपार असे अनेक खेडेगाव आहेत. हा परिसर धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवस्थाय असून शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे धानपीक वाळून रोगाने ग्रासले आहे.पावसाअभावी तलाव, बोड्यात पाणी साचले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी १४ ते २० फूट खोलात गेली. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या हलक्या प्रतिचे धान निसण्याच्या मार्गावर असताना पावसाने दगा दिला. बांध्याना भेगा पडल्या. बळीराजावर दुष्काळाची गडद छाया पडत आहे. धानाची शेती करुन आपला प्रपंच चालवणारा शेतकरी कर्जापायी आधीच हवालदिल झाला आहे. कधी बँकेकडून तर कधी स्थानिक संस्थाकडून कर्ज घेऊन शेती पिकासाठी झोकून देतो. आपला देश कृषिप्रधान आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे, असे संबोधले जाते. सव्वाशे कोटी जनतेचा पोशिंदा हलाखीचे जीवन जगत आहे. तरीही त्याच्या मदतीला शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नाही. या परिसरात काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय म्हणून शेतात विहिरीवर मोटार पंप आहेत. परंतु मोटारींना पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे विहिरीतील पाणी बाहेर पडत नाही. वारंवार तक्रार करुनही या समस्येला विद्युत विभाग गांभीर्याने घेत नाही. या देशात ब्रिटिशकाळपासून आणेवारीची पद्धत अमलात आहे. ती एकदम चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. ज्या शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीत २५ टक्के उत्पन्न येत नाही, अशा शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न दाखवून अन्याय केला जातो. या चुकीच्या आणेवारी पद्धतीने अनेक शेतकरी वंचित राहतात. त्याच सुधारणा होणे गरजेचे आहे.सध्या या परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. शासनाकडून काही आर्थिक मदत मिळेल अशी आशा आहे. त्यासाठी शासनाचे पावले उचलणे गरजेचे आहे, असे शेंडा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)