शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांच्या हालचालींवर राहणार ड्रोनची करडी नजर,कारवायांना पायबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे हे नक्षलग्रस्त आहेत. या गावात नक्षलवाद्यांचा वावर असताे. छत्तीसगड किंवा गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया केल्या. त्यानंतर ते विश्रांती घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात येतात. गोंदिया हे नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून नावारूपास आले आहे. 

ठळक मुद्देनक्षलवाद्यांचे होणार उच्चाटन : जिल्हा नियोजनातून मिळणार ४० लाखांचा निधी

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी, तसेच नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात ड्रोन तयार करण्यात येणार आहे. यासाठी गोंदियाचे जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनातून ४० लाख रुपये या ड्रोनकरता देणार आहेत. रेडझोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचा नायनाट व्हावा, यासाठी या ड्रोनची भूमिका महत्त्वाची असणार आहे.गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे हे नक्षलग्रस्त आहेत. या गावात नक्षलवाद्यांचा वावर असताे. छत्तीसगड किंवा गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया केल्या. त्यानंतर ते विश्रांती घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात येतात. गोंदिया हे नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून नावारूपास आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नक्षल हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व पोलिसांना अति गोपनीय माहिती काढण्याच्या दृष्टीने हे ड्रोन मदत करतील. नक्षलग्रस्त भागाचा विशेष कृती कार्यक्रम या योजनेतून  गोंदियाचे जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनातून या ड्रोनकरता ४० लाख रुपये देणार आहेत. मोठ्या संख्येत असलेले ड्रोन हे गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात व जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवतील. महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा, मध्यप्रदेशचा बालाघाट जिल्हा व छत्तीसगडचा राजनांदगाव जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमांवर ट्राय जंक्शन उभारण्यात आले आहे. यातूनही नक्षलवाद्यांचा बीमोड पोलिसांनी केला आहे. नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या जवानांना नक्षलवाद्यांची अचूक माहिती मिळावी यासाठी ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. 

नक्षलग्रस्त गावे मुख्य प्रवाहातएकेकाळी पोलिसांना पाहून दारे बंद करणारे आदिवासी लोक आज पोलिसांच्या हातात हात देऊन काम करत आहेत. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या आदिवसाी जनतेने आता मुख्य प्रवाहात येणे सुरू केले आहे. महाराष्ट्रात महात्मा तंटामुक्त गाव मोहिमेने आमूलाग्र बदल घडवून आणला. तंटामुक्त योजनेच्या पूर्वी पोलिसांना पाहून दारे बंद करणारी जनता आज पोलिसांना मित्र समजून चांगली मदत करू लागली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी गावात ठराव घेऊन नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. पोलिसांनीही आदिवासी जनतेला रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ याेजना, कृषी विभागाच्या विविध योजना, याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी, भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस हे आपले हितेशी म्हणून आदिवासी पोलिसांना आता मदत करू लागले आहेत.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी