शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांच्या हालचालींवर राहणार ड्रोनची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST

नरेश रहिले/ लोकमत विशेष गोंदिया : गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी, तसेच नक्षलवाद्यांच्या ...

नरेश रहिले/ लोकमत विशेष

गोंदिया : गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी, तसेच नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात ड्रोन तयार करण्यात येणार आहे. यासाठी गोंदियाचे जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनातून ४० लाख रुपये या ड्रोनकरता देणार आहेत. रेडझोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचा नायनाट व्हावा, यासाठी या ड्रोनची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे हे नक्षलग्रस्त आहेत. या गावात नक्षलवाद्यांचा वावर असताे. छत्तीसगड किंवा गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया केल्या. त्यानंतर ते विश्रांती घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात येतात. गोंदिया हे नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून नावारूपास आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नक्षल हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व पोलिसांना अति गोपनीय माहिती काढण्याच्या दृष्टीने हे ड्रोन मदत करतील. नक्षलग्रस्त भागाचा विशेष कृती कार्यक्रम या योजनेतून गोंदियाचे जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनातून या ड्रोनकरता ४० लाख रुपये देणार आहेत. मोठ्या संख्येत असलेले ड्रोन हे गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात व जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवतील. महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा, मध्यप्रदेशचा बालाघाट जिल्हा व छत्तीसगडचा राजनांदगाव जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमांवर ट्राय जंक्शन उभारण्यात आले आहे. यातूनही नक्षलवाद्यांचा बीमोड पोलिसांनी केला आहे. नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या जवानांना नक्षलवाद्यांची अचूक माहिती मिळावी यासाठी ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

बॉक्स

नक्षलग्रस्त गावे मुख्य प्रवाहात

एकेकाळी पोलिसांना पाहून दारे बंद करणारे आदिवासी लोक आज पोलिसांच्या हातात हात देऊन काम करत आहेत. नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या आदिवसाी जनतेने आता मुख्य प्रवाहात येणे सुरू केले आहे. महाराष्ट्रात महात्मा तंटामुक्त गाव मोहिमेने आमूलाग्र बदल घडवून आणला. तंटामुक्त योजनेच्या पूर्वी पोलिसांना पाहून दारे बंद करणारी जनता आज पोलिसांना मित्र समजून चांगली मदत करू लागली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी गावात ठराव घेऊन नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. पोलिसांनीही आदिवासी जनतेला रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ याेजना, कृषी विभागाच्या विविध योजना, याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी, भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस हे आपले हितेशी म्हणून आदिवासी पोलिसांना आता मदत करू लागले आहेत.