शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीवर ड्रोन वॉच

By admin | Updated: June 17, 2016 02:01 IST

जिल्ह्यातील रेतीघाटावरून होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी आणि विकास कामांची हवाई पाहणी करण्यासाठी

हवाई टेहळणी : विकास कामांची प्रगती व गुणवत्ताही तपासणारगोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटावरून होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी आणि विकास कामांची हवाई पाहणी करण्यासाठी आता ड्रोन या उपकरणाचा वापर केला जाणार आहे. त्याची चाचणीही जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनीही ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणाची पाहणी करून हे उपकरण विविध कामांवर नजर ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देईल, असा अभिप्राय व्यक्त केला.जिल्ह्यात वैनगंगा, वाघ, चुलबंद आणि शशीकिरण नदीतील रेतीघाटाचा दरवर्षी ई-लिलाव करु न रेतीची विक्री केली जाते. या रेती विक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. परंतू या रेतीघाटावरून दिवसा आणि रात्रीला मोठ्या प्रमाणात वाळूची चोरट्या मार्गाने तस्करी (चोरी) होते. परिणामी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. यावर उपाय म्हणून आता जिल्हयातील रेतीघाटांवर ड्रोनद्वारे हवाई टेहळणी करण्यात येणार आहे. जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या विविध योजनांची ड्रोनद्वारे हवाई पाहणी करण्यात येणार आहे. यामधून योजनांची प्रगती, गुणवत्ता हे सुध्दा बघावयास मिळणार आहे. विशेषत: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियानासह अन्य कामांचे फोटो व चित्रीकरण उपलब्ध होणार असून वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांना बसल्या ठिकाणीच विकास कामाची प्रगती व गुणवत्ता दिसून येण्यास मदत होणार आहे.पालकमंत्री राजकुमार बडोले दि.१३ ला जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे विविध विकास कामे कशा प्रकारे दिसू शकतात याचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी पालकमंत्र्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन समितीच्या सभापती छाया दसरे, सडक/अर्जुनी, सालेकसा, अर्जुनी/मोरगांव, गोरेगांव येथील पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा खनिकर्म अधिकारी भीमराव फुलेकर प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)वाळू चोरट्यांना स्पष्टपणे टिपणारया टेहळणीत होत असलेल्या रेती चोरीचे फोटो काढण्यात येणार आहे. तसेच चित्रीकरण सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्या ट्रॅक्टरमधून रेती चोरी होत आहे तो ट्रॅक्टर व चोरी करणारे व्यक्ती स्पष्ट दिसणार आहे. यातून रेती चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास ड्रोन हे हवाई उपकरण सहाय्यभूत ठरणार आहे.