शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामावर उपजिल्हाधिकाऱ्यांचीच वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:58 IST

बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्रशासनाने रोजगार हमी योजना जोमाने राबविण्याचे निर्देश दिले. यामुळे गावागावात विकास कामे त्वरीत सुरू करणे आवश्यक होते. परंतु ती कामे मला विचारल्याशिवाय करू नका, असा फतवा उपजिल्हाधिकारी मनरेगा यांनी काढला.

ठळक मुद्देमजुरांची भटकंती : मागच्या वर्षी जिल्हा राज्यात नंबर ‘वन’ यंदा मागे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्रशासनाने रोजगार हमी योजना जोमाने राबविण्याचे निर्देश दिले. यामुळे गावागावात विकास कामे त्वरीत सुरू करणे आवश्यक होते. परंतु ती कामे मला विचारल्याशिवाय करू नका, असा फतवा उपजिल्हाधिकारी मनरेगा यांनी काढला. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना धारेवर घेऊन कामे केल्यास तुमच्या खिशातून झालेल्या कामाचे पैसे वसूल करु अशी तंबी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामे बंद पडले आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या कार्यालयांचे आदेश वेगवेगळे आहेत. मनरेगाची कामे कशी करावीत यासंदर्भात शासन निर्णय असताना ती कामे करू नये, यासंदर्भात रोहयोचे उपजिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढून जिल्ह्यातील सर्व कामे बंद ठेवले आहेत. सध्यास्थितीत जी कामे सुरू आहेत, ती केवळ जुनी कामे आहेत. उपजिल्हाधिकारी राहेयो यांनी पत्र क्र. ३२/२०१९ दिनांक ७ जानेवारी २०१९ ला एक पत्र काढून कोणत्याही प्रकराची नवीन कामे सुरू करताना रोहयो उपजिल्हाधिकारी यांची परवनागी घेतल्याशिवाय कामे करू नये अशी ताकीद दिली आहे. त्याच प्रमाणे पत्र क्र. १६९/२०१९ दि. १३ फेब्रुवारी २०१९ नुसार सर्व रस्त्याची कामे ‘पालकमंत्री शेत पांदण रस्ते’ अंतर्गत करण्यात यावे, त्याच प्रकारे कालवा दुरूस्ती, तलावातील गाळ काढणे, नाला सरळीकरण करणे ही कामे वगळण्याचे निर्देश दिले त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामे बंद आहेत.दुसरीकडे मनरेगाची सर्व कामे त्वरीत सुरू करा, असे पत्र उपमुख्य कार्यपालन अधिकारी (मनरेगा) यांनी पत्र क्र. ४९२/२०१९, ९ जानेवारी २०१९ ला काढले आहे. त्यांनी या पत्रात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ मध्ये निवडलेल्या प्रत्येक गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम त्वरित सुरू करण्यात यावे असे निर्देश दिले आहे. एकाच योजनेचे कामे सुरू ठेवायचे किंवा नाही या संदर्भात दोन कार्यालयातील वरिष्ठांचे दोन वेगवेगळे पत्र असल्यामुळे ते काम करायचे किंवा नाही असा पेच जिल्ह्यात ही योजना राबविणाºया सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांना समोर निर्माण झाला आहे.विकासकामांना खिळ घालण्याचे काम गोंदियाचे उपजिल्हाधिकारी (मनरेगा) करीत असल्याची बाब पुढे आली आहे. मागच्या वर्षी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ७० हजारापेक्षा अधिक लोकांच्या हाताला काम दिले होते. रोहयोच्या कामाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. केवळ १९ हजार लोकांच्याच हाताला काम मिळाले ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात मागच्या वर्षी गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल होता. मात्र यंदा सर्वात मागे आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्रामपंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत. परंतु मागच्या वर्षी याचवेळी ७० हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.तीन-चार महिन्यांपासून सर्च की बंदरोहयोची नवीन कामे सुरू करण्यासाठी नवीन कामाचे सांकेतांक क्रमांक (सर्चकी) लागते. परंतु ही सर्चकी मागील तीन ते चार महिन्यापासून बंद करण्यात आल्यामुळे नवीन कामांना सुरूच करता येत नाही. हा सर्व प्रकार उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्या कार्यालयातून झाला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ५० हजारापेक्षा अधिक मजुरांच्या हाताला काम नाही.उपजिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यांचा राजीनामामनरेगाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी १३ फेब्रुवारीला आमगाव पंचायत समितीला भेट दिली. त्यांनी हजेरीपत्रक वाटप रजिस्टरची चौकशी केली असता ग्रामपंचायत बोथली व ग्रामपंचायत तिगाव येथे तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचे चौकशीत दिसले. ती कामे माझ्या परवनागी शिवाय कसे सुरू केले असे बोलून त्या कामांचा खर्च तुमच्याकडून का वसूल करण्यात येऊ नये अशी तोंडी तंबी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांना दिली असल्याचे चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे. एकीकडे उपजिल्हाधिकाºयांची भूमिका तर दुसरीकडे कामाची मागणी करणाºया मजुरांचा आक्रोश पाहता मानसिक तणावात असलेल्या चव्हाण यांनी आपला राजीनामा १८ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.