शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्यसेवक ९६६८,  फ्रंटलाइन वर्कर १९०११, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटांवरील १ लाख ८ हजार व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे.  मात्र, अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण जाणार काय, असे वाटत आहे.  दुसऱ्या डोससाठी उशीर झाला, तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असेच तज्ज्ञ व्यक्ती सांगत आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत १ लक्ष ६७ हजार नागरिकांचे लसीकरण

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लस घेण्याचा एक टाइम फ्रेम आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीने दुसरा डोस घ्यायलाच हवा. दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून सोयीनुसार घाई न करता लसीकरण करून घ्यावे.जिल्ह्यात आतापर्यंत १६८८८९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी १३९७३६ जणांना पहिला डोस, तर २९१५३ जणांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. डोस देण्यात आलेल्यांमध्ये आरोग्यसेवक ९६६८,  फ्रंटलाइन वर्कर १९०११, तसेच १८ ते ४४ व ४५ वयोगटांवरील १ लाख ८ हजार व्यक्ती व वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे.  मात्र, अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा जाणवत असल्याची चर्चा व तशी स्थितीही दिसून येत असल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणे कठीण जाणार काय, असे वाटत आहे.  दुसऱ्या डोससाठी उशीर झाला, तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, असेच तज्ज्ञ व्यक्ती सांगत आहेत. कोरोना महामारी थांबविण्यासाठी व्हॅक्सिन एक मोठे शस्त्र म्हणून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊन येणाऱ्या लाटेसाठीही आपण सज्ज होऊ शकतो, किंबहुना पहिल्याच लसीकरणांतर्गत अजूनही बहुतांश नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही. उल्लेखनीय म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ५४१०९ वरिष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. 

 डोससाठी करा थोडी प्रतीक्षा लसीचा दुसरा डोस मिळाला नाही, तर कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. टप्प्याटप्प्याने व उपलब्ध साठ्यानुसार सर्वांनाच लसीकरणाचा दुसरा डोस मिळणार आहे. एका डोसनंतर बराच उशीर झाला, अशी वायफळ चिंताही करू नये, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. 

‘हर्ड इम्युनिटी’ सार्वजनिक होईलदुसऱ्या  डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एखाद्या व्यक्तीने पहिला डोस घेतला असेल व त्यानंतर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. कोरोनामुक्त बरा झाल्यावर किमान सहा आठवड्यांनंतर लसीकरणाचा दुसरा  डोस घेता येतो. याशिवाय, नॉर्मल व्यक्तीला दुसरा डोस घेण्यासाठी उशीर झाला असेल, तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. एक किंवा दोन आठवडे  उशीर झाला, तर शरीरात कुठलाही बदल होत नाही. पहिल्या लसीकरणानंतर निर्माण झालेल्या ॲण्टिबॉडीज आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात, किंबहुना येणाऱ्या दिवसांत ‘हर्ड इम्युनिटी’  प्रकार सार्वजनिक झालेला असेल. -डॉ. विकास जैन, अध्यक्ष, आयएमए, गोंदिया 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस