शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना : मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कुठल्याही आजाराचे मूळ हे दूषित पाणी असू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे काविळ, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो हे आजार होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या दिवसात नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे तसेच बाहेरील व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. अन्यथा आपण साथीच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने उकळलेले पाणी पिणे सर्वाधिक चांगले असते. यामुळे साथीच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर पाणी पिताना काळजी घेतलेली बरी.

..............

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- उलटी, टायफाईड

कॉलरा, गॅस्ट्रो

व्हायरल, वायरल इन्फेक्शन

काविळ, अतिसार

..........................

आजाराची लक्षणे

१) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात.

२) टायफाईड दूषित पाण्यामुळे होतो. पोटात दुखते, रुग्णाला ताप येतो, उपचार न केल्यास जंतू रक्तात मिसळतात.

३) उलट्या, ताप, लघवी पिवळी हाेणे, भूक न लागणे ही काविळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणे कायम राहतात.

..............

ही घ्या काळजी, पाणी उकळून प्या

- पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.

- पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून आणि उकळून प्यावे.

- पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.

- बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

- पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.

........

गाेंदियाकर पितात दररोज ३५ हजार लीटर पाणी

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्रतिव्यक्ती ३५ लीटर याप्रमाणे दोनवेळा पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शहरात दोन ठिकाणी पाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यातून पाणी शुध्द होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो.

..............