शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच सिलिंडरचे वजन करता का?

By admin | Updated: May 30, 2015 01:23 IST

स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत़..

गोंदिया : स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत़ गॅस घरपोहोच करणारा कर्मचारी भरलेल्या सिलिंडरमधून बेमालूमपणे गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याचा प्रकार अनेकदा उघड झाला आहे, तर घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून तसेच वाहनात भरून जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही शहरात समोर आले आहेत़ त्यामुळे कमी वजनाचा गॅस आपल्या माथी मारून एजंटने फसवणूक केल्याची नागरिकांची भावना झाली आहे़ अगोदरच महागाई त्यात अशा प्रकाराने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत़ सिलिंडर चोरीत वाढ सध्या शहरात घरफोडीत मौल्यवान चीजवस्तूंबरोबर गॅस सिलिंडर चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. भुरट्या चोरासांठी अशा चोऱ्या सहज व पैसा मिळवून देणाऱ्या ठरत असल्याने सिलिंडर चोरीला जाण्याच्या घटना घडतात. घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये सोने, चांदी, मोबाइल हे चोरण्याबरोबरच आता चोरट्यांनी सिलिंडर लंपास करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गॅसच्या किमती वाढल्यापासून या प्रकारच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सिलिंडर चोरीला जाण्याच्या घटनांची मोठ्या संख्येने नोंद होत आहेत. चोरलेले सिलिंडर गॅसवर चालणाऱ्या गाड्यांना एक हजार रुपये किमतीना विकले जातात. त्याचप्रमाणे भंगारात अथवा कमी किमतीला ओळखीच्या ठिकाणी विकली जातात. सध्या गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती व उपलब्धतेच्या कमतरतेमुळे अशा चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. प्राथमिक पातळीवर पाहता या चोरीने मोठा फरक पडल्याचे दिसून येत नसले तरी अशा चोऱ्यांमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे़ घरगुती सिलिंडरमधून चोरी शहरातील ग्राहकांना घरपोच सिलिंडरची सेवा देणाऱ्या एका गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून भरलेल्या सिलिंडरमधून गॅसची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आला आहे. त्यांच्याकडून भरलेले व रिकामे असे सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यामुळे गॅस एजन्सी व तेथील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते, हे उघड झाले आहे. सुरुवातीला ज्यादा दराने सिलिंडरची विक्री व आता थेट भरलेल्या सिलिंडरमधून गॅसची चोरी केली जात असल्याचे प्रकार सुरू असल्याने सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची ओरड ग्राहकांकडून केली जात असतानाच हे प्रकार उघडकीस आले आहेत़ एजन्सीवाले गॅसच्या काळाबाजारात?अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही. घरगुती सिलिंडर व्यावसायिकांना विकून पैसा कमाविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. अशा वेळी एजन्सीवाले काय करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उलट काही एजन्सीवाले गॅसच्या काळ्याबाजारात सहभागी होऊन नफेखोरी करतात, असे आरोप ग्राहकांकडून केले जात आहेत. पुरवठा विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नाही. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरूच आहे. सर्वच गॅसच्या एजन्सीज त्यात सहभागी नाहीत. काही चांगल्या पद्धतीने काम करून ग्राहकांना नियमित व वेळेवर गॅसचा पुरवठा करतात, पण त्यांची संख्या कमी आहे. गॅसचा हा काळाबाजार वाढला असला तरी गॅसचा होणारा अनधिकृत वापर हा तर काळ्याबाजारापेक्षाही धोकेदायक बनू लागला आहे. गॅसचा वाहनांसाठी होणारा व्यापार अत्यंत घातक बनू लागला आहे. अनेकदा या गॅसच्या वापरामुळे वाहनांचा स्फोट होऊन अपघात झाले आहेत. सिलिंडर दरात फ सवणूक गॅस संपला तर लगेच मिळायला हवा, परंतु अनेकदा तो दिला जात नाही. मात्र, दुसरीकडे गॅस सिलिंडर काळ्याबाजारात राजरोस विकला जातो. यामुळे तुटवडा निर्माण होतो. घरगुती विनाअनुदानित गॅससाठी ४७0 रु पये घेतले जातात. घरगुती गॅसचे वजन १४़६ किलो असते, परंतु अनेकदा तो कमी भरतो. काही टोळ्या हा गॅस काढून घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर देताना त्याचे वजन करून दिले पाहिजे, पण किती एजन्सीज हा नियम पाळतात, हा प्रश्न आहे़