शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर साहेब माझा आरटीपीसीआर रिपोर्ट कधी येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लक्षणे दिसताच वेळीच कोरोना चाचणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यापासून आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी करीत आहे. त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी गोंदिया येथील मेडिकलच्या प्रयाेगशाळेत केली जाते.

ठळक मुद्दे५८३८ स्वॅब नमुन्यांचा रिपोर्ट प्रलबिंत : आठ दिवस लोटूनही रिपोर्ट मिळेना : कसे रोखणार कोरोनाला, जिल्हावासीयांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मला लक्षणे दिसू लागल्याने मी आठ दिवसांपूर्वी गोंदिया येथील गोविंदपूर येथील कोरोना चाचणी केंद्रावर जाऊन आरटीपीसीआर टेस्ट केली. मात्र आठ दिवस लोटूनही मला रिपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हेच कळत नसल्याने उपचार तरी कसा करणार, कुटुंबीय सुध्दा माझ्यामुळे चिंतेत आहेत. मी संबंधित केंद्रावरील कर्मचारी आणि डॉक्टरांना साहेब माझा आरटीपीसीआर रिपाेर्ट कधी येणार असे विचारतो आणि परत जातो. मागील आठ दिवसांपासून हाच प्रकार सुरू असल्याचे कोरोना चाचणी केलेल्या एका नागरिकाने सांगितले. मात्र त्यांच्या सारखीच स्थिती चाचणी केलेल्या अनेकांची आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लक्षणे दिसताच वेळीच कोरोना चाचणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यापासून आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी करीत आहे. त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी गोंदिया येथील मेडिकलच्या प्रयाेगशाळेत केली जाते. मात्र या प्रयोगशाळेतील डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे एकूण १४ जण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर नागपूर येथील मनुष्यबळ बोलावून काही प्रमाणात चाचण्या केल्या जात आहे. मात्र त्यात काही तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत (दि.२५) प्रलबिंत स्वॅब नमुन्यांची संख्या ५८३८ पोहचली आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांना आठ-आठ दिवस रिपोर्ट मिळत नसल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. तर संशयितांचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने संसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयात जाऊन चाचणी केल्यास तिथे सुध्दा दोन तीन दिवस वेटिंग आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखणार तरी कसे प्रश्न निर्माण झाला आहे.  

नवीन आरटीपीसीआर मशीन येणार तरी कधी?पालकमंत्री नबाव मलिक यांनी १६ एप्रिल रोजी गोंदिया येथे आढावा बैठक घेऊन आठ दिवसात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. पालकमंत्र्यांनी स्वत: आठ दिवसात नवीन आरटीपीसीआर मशीन मेडिकलच्या प्रयोगशाळेत लावण्याची ग्वाही दिली होती. याला आता आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. पण अद्यापही आरटीपीसीआर मशीन आली नाही. मग जिल्हावासीयांनी आता कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोविड केअर सेंटरमधील कुलर केव्हा सुरू होणार कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. मात्र तिथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला असला तरी अद्यापही काही कोविड केअर सेंटरमधील कुलरचे स्वीच ऑन झाले नाही. स्वच्छतेचा तर पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे सुध्दा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या