शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

डॉक्टरांनी काढला मोर्चा

By admin | Updated: November 17, 2016 00:19 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी आयएमए सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया : आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी आयएमए सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने वचनपूर्तीची हमी मागे घेण्यात आली. सातत्याने पाठपुरावा करूनही आतापर्यंत वचनपूर्ती करण्यात आली नाही, उलट शासनाने एमसीआय बरखास्त करून त्याऐवजी एनएमसी (नॅशनल मेडीकल कमिशन) नेमण्याचा घाट रचल्याने आज बुधवारी वैद्यकीय व्यावसायिकांनी गोंदियाच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी या मोर्च्याला हिरवी झेंडी दाखवून मोर्च्याची सुरूवात केली. बुधवार सकाळी ११ वाजता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातून या मोर्च्याला सुरूवात करण्यात आली. मोर्चा केटीएस, नेहरू चौक, जमनालाल बजाज पुतळा, गोरेलाल चौक दुर्गा चौक, नगर परिषद, गांधी प्रतिमा होत पोलीस ठाणे मार्ग गोरेलाल चौकातून ही रॅली केटीएस मध्ये पोहचली. गोंदियातील सर्व डॉक्टर या रॅलीत सहभागी झाले होते.एमसीआय ही मॉडर्न मेडीसिनची नियामक स्वायत्त संस्था असून त्यात लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सभासदांसोबतच काही सरकारी नामनिर्देशित सभासद असतात. एनएमसीमध्ये (नॅशनल मेडीकल कमिशन) केवळ सरकारी नामनिर्देशित सभासद राहणार असून त्यातही ६० टक्के प्रतिनिधी गैरवैद्यकीय क्षेत्रातील राहणार आहेत. सरकारी एकाधिकार असणाऱ्या एनएमसीची स्थापना लोकशाहीला गालबोट आहे. वैद्यकीय शिक्षण व सेवा धोक्यात आणण्याचा निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनएमसी केवळ सरकारी नामनिर्देशित सभासदांची कमिटी आहे. ५० टक्के सभासद बिगर वैद्यकीय. खासगी मेडीकल कॉलेजांना संपूर्ण स्वायत्तता व ६० ते ९९ टक्के फी वाढीचा अधिकार, आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी व इतर पॅथींना अ‍ॅलोपॅथीचे औषधे वापरण्यास मुभा, भरमसाठ फी असलेले वैद्यकीय शिक्षण आणखी महागले आहे. वैद्यकीय सेवा महाग व रूग्णांच्या जीवाला धोका करणाऱ्या सदर कमिटीला आयएमएचा विरोध आहे. नॅशनल मेडीकल कमिशन रद्द करणे, वैद्यकीय व्यावसायिकांची स्वायत्तता अबाधित ठेवून एमसीआयमध्ये योग्य बदल करणे. डॉक्टरांनी छोटी हॉस्पिटल्स व फॅमिली डॉक्टरला क्लिनिकल एस्टॉब्लिशमेंट अ‍ॅक्टमधून वगळावे, त्यामुळे आरोग्य सेवा महागणार नाही, पीसीपीएनडीटी कायद्यात बदल, गंभीर शिक्षा केवळ गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्यांसाठीच असावी. कागदोपत्री चुकांना गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा व्हावी. डॉक्टर्स व हॉस्पिटल्ससाठी केंद्रीय सुरक्षा कायदा, क्रॉसपॅथीला विरोध आदी मागण्यांचा समावेश होता.या मोर्चात आयएमएचे अध्यक्ष डॉ. आभा सोनकिया, माजी अध्यक्ष डॉ. घनश्याम तुरकर, डॉ. लक्ष्मी गुप्ता, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अशोक चौरसिया, डॉ. मोहन, डॉ. सुधीर जोशी, डॉ. उमेश शर्मा, डॉ. चिटणवीस, डॉ. पाली बग्गा, डॉ. कोतवाल, डॉ. लता जैन, डॉ. राणा व इतर डॉक्टर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)