शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी विलंब करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम आपण सर्वांनी भोगले आहेत. श्रावण, भाद्रपद गौरी गणपती सणामुळे बाजारपेठेत अनियंत्रित ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम आपण सर्वांनी भोगले आहेत. श्रावण, भाद्रपद गौरी गणपती सणामुळे बाजारपेठेत अनियंत्रित गर्दी उसळली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या कोरोना लाटेचा इशारा दिलेला आहे. तिकडे केरळमध्ये ओणम या सणासुदीला गर्दी केल्याने पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे. त्यामुळे कोरोनापासून सरंक्षण पाहिजे असेल तर दुसऱ्या डोससाठी विलंब करू नका असे केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कळविले आहे.

शहरात लसीकरणाच्या प्रमाणात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे प्रत्येक वाॅर्ड व प्रभागाप्रमाणे लसीकरण याद्या पडताळणी करून ज्यांचा दुसरा डोस काही कारणामुळे राहिला असेल त्यांनी त्वरित जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. तसेच दररोज कुंभारे नगर, केटीएस रुग्णालय, मरारटोली, गोविंदपूर व राजस्थानी स्कूलमध्ये लसीकरण सत्र सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू आहे. यात ऑन द स्पॉट नोंदणीची सोय असल्याने लवकरात लवकर लसीकरण करून घेता येते. त्यामुळे १८ वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. हुबेकर यांनी केले आहे.