शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार १०० ‘ग्राम वन’

By admin | Updated: February 29, 2016 01:13 IST

जंगलांचे संरक्षण व संवर्धन करून वणव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ग्राम वन योजना लागू केली.

‘पेसा’त एकही गाव नाही : कुंभारटोली व धाबेटेकडी झाले ग्राम वननरेश रहिले  गोंदियाजंगलांचे संरक्षण व संवर्धन करून वणव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने ग्राम वन योजना लागू केली. यात गावातील वनसंपत्तीतून मिळणारे उत्पन्न त्याच गावाला दिले जाणार आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १०० गावांनी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी २०१६) ठराव घेऊन आपल्या गावाला ग्राम वन करण्याचा निर्धार केला आहे.ग्रामवन नियम लागू करण्याचा ठराव ग्रामसभेत घेऊन तो उपवनसंरक्षक यांच्याकडे देण्यात येतो. त्यानुसार संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वनक्षेत्रात अतिक्रमणावर प्रतिबंध लावण्याकरिता काय उपाययोजना केल्या त्याची पाहणी वनाधिकाऱ्यांकडून केली जाते. त्या गावात वणव्याचे प्रमाण किती, वणवा नियंत्रणासाठी समितीने सहभाग दिला आहे का, त्या क्षेत्रात वणव्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा कमी ठेवण्यात यश आले का, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी परिणामकारक राबविली आहे का? त्या गावाला संत तुकाराम वनग्राम योजनेकरीता जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय बक्षीस मिळाले का? आदी मुद्द्यांची तपासणी करून गावांना ग्रामवन योजनेत समाविष्ठ केले जाते.ग्रामवनासाठी निवड झालेल्या गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला अर्थसंकल्पित अनुदानातून १ हजार रूपये प्रतिहेक्टर प्रतिवर्ष याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. वनांना हाणी पोचविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे किंवा त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्याचा अधिकारही त्या समितीला राहणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी ही दोन गावे ग्रामवन म्हणून उदयास आली आहेत. एकेकाळी माळरान असलेल्या कुंभारटोली परिसराला नैसर्गिक सौंदर्याने नटविण्याचे काम तेथील वनाधिकारी एल.एस. भुते यांनी केले आहे. ही दोन गावे सप्टेंबर २०१४ मध्ये ग्रामवन झाली आहेत.पाच गावांच्या प्रस्तावात त्रुटीसन १९९२ पासून लोसहभागातून वनव्यवस्थापन करण्यात येते. संयुक्त वन व्यवस्थापनाचा पुढचा टप्पा म्हणून ग्राम वन ही संकल्पना पुढे आली. ग्रामवनसाठी ११ जून २०१४ रोजी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका, नवेगाव येथील डोंगरगाव, गोंदिया तालुक्यातील फत्तेपूर, २१ जून २०१४ रोजी किडंगीपार, २५ जुलै २०१४ रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला या गावांचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविण्यात आला होता. परंतु या प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे ही गावे ग्रामवन होऊ शकली नाहीत. ुकुंभारटोलीला मिळणार ६ ते ७ लाखग्राम वन असलेल्या कुंभाटोलीने वनाधिकारी एल.एस. भुते यांच्यापासून प्रेरणा घेऊन राबविलेल्या उपक्रमामुळे हे गाव ग्रामवन म्हणून पुढे आले. या गावातील तोडलेल्या बांबूपासून त्या गावाला ६ ते ७ लाख रूपये मिळणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक रामगावकर यांनी दिली.पेसा हा कायदा गोंदिया जिल्ह्यात एकाही गावाला लागू होत नाही. कोणते गाव या कायद्यात येईल हे केंद्र सरकार ठरवित असते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील एकही गाव पेसा कायद्यात येत नसल्याने संपूर्ण जिल्हा ग्रामवन करण्यात काहीही अडचण नाही. नागरिकांनी वनांच्या संरक्षणासाठी पुढे यावे.- जितेंद्र रामगावकरउपवनसंरक्षक, वनविभाग गोंदिया