शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसकडे जिल्हावासीयांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनापासून बचावासाठी जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू आहे. ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनापासून बचावासाठी जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू आहे. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात ५६ टक्के लसीकरण झाले असून, यामध्ये मात्र दुसरा डोस घेणारे फक्त १२ टक्के नागरिकच आहेत. यावरून दुसरा डोस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज असल्याने लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याची गरज आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहरानंतर जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय आता कोरोनाला मात देण्यासाठी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, अवघ्या देशात लसीकरणाला घेऊन गांभीर्याने काम सुरू आहे. यामुळेच केंद्र व राज्य शासनाची प्रत्येकच जिह्यातील लसीकरणावर बारकाईने नजर आहे. परिणामी जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू असून, रविवारपर्यंत (दि. २२) ७२१०३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६ टक्के नागरिकांचे लसीकरण आटोपले आहे. मात्र गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यातील ५६ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असतानाच यातील ५६०७४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्याची ४३ एवढी टक्केवारी आहे. तर १६०२९१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्याची फक्त १२ एवढी टक्केवारी आहे. ही आकडेवारी बघता नागरिक लसीकरणासाठी उत्साहात पुढे येत असून, दुसरा घेण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र त्यासाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे, असे स्पष्टपणे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तरीही नागरिकांकडून बेजबाबदारपणा दाखविणे ही गंभीर बाब आहे.

---------------------------------

कोरोना गेला, आता लसीची गरज काय?

एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात लसीकरणासाठी जिल्ह्यात सर्वत्र धावपळ उडाली होती. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक लसीकरणासाठी धडपडत होते; मात्र आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आली असल्याने आता कोरोना तर गेला, मग लसीकरणाची गरज काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. हेच कारण आहे की, पहिली लस घेतल्यानंतर आता दुसऱ्या डोससाठी नागरिक कारणे शोधत आहेत.

------------------------------

अशी आहे लसीकरणाची आकडेवारी

गट पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी १०२८१ ६१३८

फ्रंटलाईन वर्कर्स २४३१७ १२६६१

१८-४४ २३६१८७ ३८०७८

४५-६० १९१०५९ ३८७५७

६० प्लस ९८८९८ ३८७५७