शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पारा @ ४२.२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

गोंदिया : नवतपा लागताच आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेला पारा आता चांगलाच वर चढू लागला आहे. बुधवारपासून बघितले असता, ...

गोंदिया : नवतपा लागताच आतापर्यंत ४० डिग्रीच्या आत असलेला पारा आता चांगलाच वर चढू लागला आहे. बुधवारपासून बघितले असता, जिल्ह्यातील पारा ४२ डिग्रीच्या घरात पोहोचला आहे. येत्या २ जूनपर्यंत नवतपा असल्याने आणखी दोन दिवस जिल्हावासीयांना हा उकाडा सहन करावा लागणार असल्याचे दिसते.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाने हजेरी लावल्याने मे-हिटचा त्रास जाणवला नव्हता. तोपर्यंत पाराही ३८-३९ डिग्रीपर्यंतच पोहोचला होता. मात्र मंगळवारपासून (दि.२५) नवतपा लागला व बघता-बघता पारा ४० डिग्रीच्या पार गेला असून, आता दररोज ४२ डिग्रीवर जाऊन थांबला आहे. आठवडाभरापासूनच ही स्थिती असून, यामुळे नवतपा आता आपल्या रंगात आल्याचे दिसत आहे. उन्हाळ्यातील सर्वाधिक उकाड्याचे हे ९ दिवस असल्याचे बोलले जात असून, त्याची प्रचिती आता दिसून येत आहे. सोमवारीही जिल्ह्यातील तापमान बघितले असता, ४२.२ डिग्रीएवढे नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने यंदा नवतपातही ढगा‌ळ वातावरण व पाऊस सांगत तापमान सामान्य राहणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तसे काही झाले नसून, उलट नवतपा लागताच पारा वेगाने चढला व आता थेट ४२ डिग्रीवर जाऊनच थांबल्याचे दिसत आहे. मात्र अचानकच झालेल्या या तापमान वाढीमुळे जिल्हावासीयांचा जीव कासावीस झाला आहे. अशात कधी पाऊस पडतो व या उकाड्यापासून एकदाची सुटका मिळते, अशीच सर्वांची इच्छा आहे.

------------------------------

एसी व कुलरही झाले फेल

आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ३८-३९ डिग्रीपर्यंतच गेले होते. त्यातही ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत नव्हता. मात्र आता अचानक तापमान ४२.२ पर्यंत गेल्याने जिल्हावासीयांना हा उकाडा असह्य होत आहे. विशेष म्हणजे, आता एसी व कुलरही फेल ठरत असल्याचे नागरिक बोलत आहेत. यावर आता एकच उपाय असून, पावसाने हजेरी लावली तरच यापासून सुटका होणार आहे.