शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने केले १०८ टक्के कर्जवाटप

By admin | Updated: August 21, 2015 02:12 IST

ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचे कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हितचिंतक असल्याचे सिद्ध झाले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप गोंदिया : ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिकचे कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हितचिंतक असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्हा बँकेने १०८ टक्के खरिप हंगामाचे कर्जवाटप केले असून अजूनही कर्जवाटप सुरूच आहे. जिल्हा बँकेने या हंगामात ९५ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्याला धानाचे कोठार अशी ख्याती देण्यात असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाची अवकृपा यात महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील शेतकऱ्याला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. तर शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. हे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांप्रती असलेला आत्मीयतेचा भाव दिसून येतो. परिणामी जिल्हा बँक ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. यंदाही जिल्हा बँकेने ठरवून दिलेले उद्दीष्ट गाठले असूनही आता त्यापलीकडे कर्जवाटप करीत आहे यंदा जिल्हा बँकेला ८८ कोटी ६३ लाख रूपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने उद्दीष्ट पूर्ती केली असून ३२३ संस्था, ३० हजार ४१६ सभासद व ८८ हजार ११३ आराजी करिता ९५ कोटी ४७ लाख ६५ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. याची चक्क १०८ एवढी टक्केवारी आहे. विशेष कर्जासाठी आजही शेतकरी येत असल्याने त्यांना परतावून न लावता कर्ज दिले असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी द्विवेदी यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)