शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३०४ शाखांमधून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST

गोंदिया: ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू ...

गोंदिया: ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तत्कालीन पिढीतील गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आजही त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवित आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ३०४ शाखांमधून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार गावागावांत होत असून त्यांच्या कीर्तनाचा गजर अनेक गावांत समाजाला घडविण्याचे काम करीत आहे.

गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर तुकडोजी महाराजांचे कीर्तन, प्रबोधन अनेक गावांत झाले. त्यातून प्रेरित झालेले अनेक लोक गुरुदेव सेवा मंडळाचे सेवेकरी होऊन आयुष्यभर त्यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करीत आहेत. त्यामुळेच महाराजांची १०६ वी जयंती गुरुकुंज आश्रमाबरोबर गोंदिया जिल्ह्यातही अनेक ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे गुरुदेवप्रेमी घरातच ग्राम जयंती साजरी करणार ओहत. तुकडोजी महाराजांच्या कीर्तनातून प्रेरणा मिळालेले जिल्ह्यातील त्यावेळचे बालक आताचे ज्येष्ठ नागरिक आहेत. आताही ते गावागावांत गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करतात. व्यसनाधीनता, दारू, गांजा, चोरी यावर तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनांच्या माध्यमातून जनजागृती करतात. भ्रूणहत्या, आत्महत्या करू नका असा संदेश देत शरीर स्वच्छतेबाबत वैचारिक दृष्टिकोन बदलविण्यासाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता, लहर की बरखा, अभंग, विविध भजनांची पुस्तके समग्र वाङ्‌मयाच्या माध्यमातून प्रबोधन करतात; परंतु मागच्या वर्षीपासून कोरोनाचे संकट पाहून ग्राम जयंती घरातूनच साजरी करू, असे सर्वाधिकारी ह.भ.प. एम. ए. ठाकूर म्हणाले.

बॉक्स

जिल्ह्यात १४ ग्रामगीताचार्य

जिल्ह्यात राष्ट्रसंताच्या विचारांनी प्रेरणा घेऊन गावागावांत राष्ट्रसंताचे कार्य पोहोचविणाऱ्या गुरुदेव सेवकांनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा अभ्यास करून ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त केली. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १४ ग्रामगीताचार्य झाले आहेत. ते ग्रामगीताचार्य राष्ट्रसंताचे विचार समाजात पेरण्याचे काम करीत आहेत.