शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना

By admin | Updated: May 22, 2015 02:05 IST

तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट-१८१ ची माहिती मागितली होती.

आमगाव : तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट-१८१ ची माहिती मागितली होती. त्यात सदर गट क्रमांकावर कुणाचे अतिक्रमण की सदर गट सरकारी आहे, अशी २६ नोव्हेंबर २०१४ रोजी माहिती तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना मागितली. मात्र संबंधित जागेच्या चौकशीनंतर कागदपत्र देण्याचे तोंडी आदेश तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी तसेच सबंधित लिपीक यांना दिले. मात्र तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना करीत सबंधित कर्मचाऱ्यांनी कागदपत्र अद्याप दिले नाही. धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांची तीन महिन्यांपासून कागदपत्रांकरिता भटकंती सुरू आहे. मात्र ते देण्यास टाळाटाळ होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट क्रमांक १८१ ची माहिती मागितली. सदर गट टिसीएम नालीच्या आत आहे. यावर कुणाचे अतिक्रमण आहे किंवा सरकारी जमीन आहे, याबाबद २६ नोव्हेंबर २०१४ रोजी माहिती मागितली. यावर ४ डिसेंबर २०१४ रोजी अर्जदाराला १८१ गटमध्ये राधेलाल वट्टी धोबीटोला यांचे अतिक्रमण नोंद दाखविण्यात आले. तर नकाशा मात्र गट क्रमांक- १८६ चा देण्यात आला. या दोन गटाच्या फरकामुळे विसंगती असल्याने अर्जदार रेवा पारधी यांनी दोन्ही माहिती चुकीच्या आहेत, असे निदर्शनास आणून दिले. यावर तहसीलदार राजीव शक्करवार यांनी अर्जदाराला अपील करण्याकरिता सांगितले. त्यावर १० फेब्रुवारी २०१५ रोजी अपील सादर करण्यात आले. यावर आदेशान्वये मंडल अधिकारी कोरे व तलाठी मेश्राम यांना मौका चौकशीचे आदेश तहसीलदाराकडून देण्यात आले. यावर सदर जागा तुमच्या मालकीची आहे, असे सांगण्यात आले. लेखी मागितले असता मंडल अधिकारी कोरे यांनी अर्जदाराला अतिक्रमण आहे, असे सांगितले. यावर तर सदर जागा सरकारी आहे, असे सांगून लेखीपत्र तहसीलदार, मंडळ निरीक्षक किंवा तलाठी यांच्याकडून देण्यात आले नाही. अर्जदार रेवा फुलीचंद पारधी यांनी सदर प्रकरण क्रमांक २१२ व गट क्रमांक १८१ ची माहिती मागितली. मात्र तहसील कार्यालयातील संबंधित लिपिकाकडून प्रकरणाची फाईल दिसत नाही, असे सांगितले जाते. सदर फाईल गायब झाल्याचे सांगून अधिकारी दिशाभूल केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)