शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद स्थायी समितीत अनेक विषयांवर चर्चा

By admin | Updated: May 23, 2014 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली,

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, तर आरोग्य विभाग सर्वाधिक चर्चेत राहिला. बैठक सुरू होताच विषय सूचीनुसार वैधानिक विकास महामंडळाद्वारे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या विकास कार्यांच्या मंजूरी देण्याचा विषय ठेवण्यात आला. यावर चर्चा सुरू करताना राकाँपाचे जि.प. सदस्य कुंदन कटोरे म्हणाले की, जेव्हा निधी खर्च करण्यात आली तेव्हा सभागृहाची मंजूरी घेण्यात आली नाही. मग आता त्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत कशी मंजूरी दिली जावू शकते? ते म्हणाले की, हा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी ठेवायला हवा. यानंतर अध्यक्षांनी सदर विषयाला जि.प. च्या पुढील सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी ठेवण्याचे निर्देश दिले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर.के. गहलोत यांनी आरोग्य विभागात ४४ परिचारिकांच्या भरतीचा विषय ठेवला. यावर जि.प. सदस्य विनोद अग्रवाल म्हणाले की, ज्या परिचारिकांनी पूर्वी आरोग्य विभागात अस्थायी तत्वावर आपली सेवा दिली आहे, त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार सूची तयार करून त्यांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मागील वर्षी अशा २३६ एएनएमची सूची तयार करण्यात आली होती. परंतु त्या सूचीत परिचारिकांची नावे त्यांच्या ज्येष्ठता क्रमानुसार नसल्याची कबुली स्वत: आरोग्य विभागाने दिली होती. सदर सूचीत आतापर्यंत सुधारणा करण्यात आले नाही. ४४ एएनएमच्या भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या सूचीतसुद्धा त्यांनी आधी केलेल्या सेवाज्येष्ठतेला गृहीत धरण्यात आले नाही. त्यामुळे काही उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यांनी ज्येष्ठता सूचीला त्रुटिरहित केल्यानंतरच भरती करण्यात यावी, अशी भूमिका घेतली. यावर अतिरिक्त आरोग्य अधिकारी उत्तर न देता टालमटोल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसले. यानंतर या विषयावर पुढील सभेत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प. सदस्य विनोद अग्रवाल म्हणाले की, गोरेगाव तालुक्याच्या तुमसर ग्रामपंचायतीत मनरेगाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामात कोणत्याही प्रकारची धांदली व घोटाळा झालेला नाही. त्यांनी तक्रारीच्या चौकशीनंतरच दोषींच्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होवू नये. यानंतर अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. बैठकीत आरोग्य विभागाच्या अम्बुलंससाठी संविदा आधारावर वाहन चालकांच्या नियुक्तीच्या विषयावरसुद्धा विस्ताराने चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर या मुद्याला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प. सदस्य डॉ. योगेंद्र भगत व कुंदन कटारे यांनी समाजकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ठेवत म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दलित वस्ती सुधार योजना लेखाशीर्ष अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कामांना बंद करून जे काम बंद झालेले आहेत, त्यांचे बिल न काढण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. परंतु सभागृहात मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून अधिकार्‍यांनी अनेक कामे करवून त्यांचे बिलसुद्धा काढले आहे. याची माहिती कुणालाही नाही. डॉ. योगेंद्र भगत यांनी काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संबंधित कंत्राटदारांशी साठगाठ असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, जि.प. सदस्यांद्वारे कंत्राटदारांकडून अवैध वसूली केली जाते. जि.प. अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले. बैठकीत समाजकल्याण अधिकारी यांच्या अनुपस्थितीमुळे या विभागाच्या संबंधित विषयांवर चर्चा होवू शकली नाही. स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मदन पटले, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, कृषी सभापती मोरेश्वर कटरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद अग्रवाल, राजेश चांदेवार व कुलदीप भाटिया व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)