शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका

By admin | Updated: January 19, 2017 01:37 IST

माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी तिरोडा तालुक्यात आॅगस्ट २०१४ ते जुलै २०१५ या काळात

राज्य माहिती आयोगाचा दणका : माहितीच्या अधिकारात माहिती न दिल्याचा प्रकार गोंदिया : माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी तिरोडा तालुक्यात आॅगस्ट २०१४ ते जुलै २०१५ या काळात केलेला दौरा दैनंदिनी व गावात भेटी दिलेल्या व्हिजीट बुकची साक्षांकीत प्रत देण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु यावर माहिती न देणाऱ्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयुक्त यांनी शिस्तभंगाचा ठपका ठेवत स्पष्टीकरण मागीतले आहे. तिरोडा तालुक्यातील किती गावातील बांधकामाची पाहणी करून मुल्यांकन प्रमाणपत्र व पूर्णत्वाचे प्रामणपत्र देण्यात आले. याची साक्षांकरीत सत्यप्रत देण्याचीमागणी करण्यात आली. परंतु जन माहिती अधिकारी यांनी विहीत मुदतीत कोणताही प्रतिसाद दिला नाही. माहिती न मिळाल्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी घ्यायला पाहिजे होती परंतु ते ही घेण्यात आली नाही. माहिती न मिळाल्याने आयोगाकडे द्वितीय अपील सादर केल्याने आयोगाने त्यावर सुनावणी ठेवली. सुनावणीच्या दिवशी अपिलार्थी हजर होते. परंतु जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी गैरहजर होते. कुठलीही सूचना न देता अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे अपिलार्थ्याला १५ दिवसाच्या आत सदर माहिती विनामूल्य देण्यात यावी व ३० दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश जनमाहिती अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण कार्यालय जि.प.गोंदिया यांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी) - ग्रामसेवक व बीडीओलाही दणका गट ग्रामपंचायत सोनोली/ बिरोली येथील सन १९९० ते १९९४ या काळात जन्म व मृत्युच्या नोंदीची माहिती महेंंद्र नंदागवळी यांनी मागीतली होती. परंतु माहितीच्या अधिकारात त्यांना माहिती देण्यात आली नाही. त्याबद्दल ग्रामसेवक व खंडविकास अधिकारी याच्यावर ठपका ठेवत सात दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले.