शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘ढेरेपोटे’ पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शिस्त, गस्त आणि बंदोबस्त यात सतत व्यस्त राहणाऱ्या पोलिसांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जेवणाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : शिस्त, गस्त आणि बंदोबस्त यात सतत व्यस्त राहणाऱ्या पोलिसांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जेवणाची किंवा झोपण्याची वेळ नाही, वेळ मिळेल तशी दिनचर्या व कामे पोलिसांना करावीच लागतात. सतत कामाचा ताण त्यांच्यावर राहात असल्याने आणि जेवणाची वेळ निश्चित नसल्याने बहुतांश पोलिसांचे पोट सुटले आहे. पोलिसांना ढेरे सुटल्याने गस्त किंवा तपासाचे काम करताना अडचण होते.

गोंदिया जिल्ह्यात २,१०१ पोलीस आहेत. परंतु, बहुतांश पोलिसांचे पोट सुटले असून, मधुमेह व उच्चरक्तदाब यासारखे आजार घेऊनही पोलिसांना २४ तास कर्तव्य बजावावे लागत आहे. चोरी, दरोडे व अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर तहान-भूक बाजूला सारून शांतता होईपर्यंत पोलिसांना २४ तास डोळ्यात अंजन घालून काम करावे लागते. कामाच्या नादात जेवणाकडे दुर्लक्ष होते. जेवणाकडे कानाडोळा झाला तर त्याचा विपरीत परिणाम शरिरावर होतो. वेळी-अवेळी जेवण, बंदोबस्ताच्या काळात मिळेल ते खाणे यामुळे पोलिसांचे पोट सुटत आहे. परंतु, नोकरी करताना फिटनेस प्रमाणपत्र पोलिसांना द्यावे लागते. आधी खासगी डॉक्टरांचेही फिटनेस प्रमाणपत्र चालत होते. परंतु, आता हे प्रमाणपत्र सरकारी डॉक्टरांचेच घ्यावे लागते.

......................................

फक्त २०० अर्ज

फिटनेस सर्टिफिकेटकरिता गोंदिया जिल्ह्यातील २०० पोलिसांचे अर्ज आले आहेत. फिटनेस असलेल्या पोलिसांना फिटनेस सर्टिफिकेट दिल्यावर दरमहा २५० रूपये दिले जातात. त्यासाठी आपण फिट आहोत यासाठी २०० पोलिसांनी अर्ज केले असून, आणखी काही पोलीस अर्ज करत आहेत.

...................

जेवणालाही वेळ मिळत नाही

१) आपण २४ तास ७ दिवस काम करताना जेवणाला वेळ मिळत नाही. पुरेशी झोप होत नाही, कधी रात्री तर कधी दिवसा ड्युटी करावी लागते. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. इतर कर्मचाऱ्यांसारखी पोलिसांचीही निश्चित वेळ केल्यास त्याचा फायदा पोलिसांच्या आरोग्याला होईल.

- एक पोलीस कर्मचारी

.....................

कर्तव्य बजावत असताना कुटुंबाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष होते. शासनाचे कर्तव्य पार पाडताना आरोग्याकडेही दुर्लक्ष होतो. कामाच्या नादात जेवणाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे पोट वाढते. सतत काम करताना शरिराला आराम नाही, मिळेल ते खाऊन काम प्राधान्याने केले जाते. त्यामुळे आरोग्य बिघडत आहे.

- एक पोलीस हवालदार

...............

कसे राखणार आरोग्य ?

७ दिवस २४ तास राबणाऱ्या पोलिसांना साप्ताहिक सुट्टी असली तरी त्या साप्ताहिक सुट्टीवेळी सण, उत्सव, मेळावे, नेत्यांचे दौरे, मोर्चे, आंदोलने किंवा कायदा आणि सुव्यवस्थेतेचा प्रश्न निर्माण झाला तर आपली साप्ताहिक सुट्टी सोडून कामावर हजर राहावे लागते. सतत तणाव व वेळेवर जेवण आणि झोप होत नसल्याने आरोग्य कसे राखणार, हा प्रश्न उद्भवत आहे.

................

ढेरी सुटलेल्या पोलिसांना धावताच येत नाही

एखाद्या ढेरी सुटलेल्या पोलिसाच्या समोरून चोर किंवा आरोपी पळत असला तरी त्या चोराला पोलीस पकडू शकत नाही. ढेरी सुटलेल्या पोलिसांपेक्षा आरोपीच सुसाट पळतात. त्यामुळे पोलिसांना पोट कमी करणे आवश्यक आहे. पोट कमी झाल्यावर आरोग्यसुध्दा उत्तम राहील.