शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकाच्या गर्दीने फुलले ढासगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

केशोरी : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे देवरी तालुक्यातील चिचगडवरून पश्चिमेस ६ किमी अंतरावर येत असलेल्या निसर्गरम्य ढासगड (मोहाडी) येथे ...

केशोरी : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे देवरी तालुक्यातील चिचगडवरून पश्चिमेस ६ किमी अंतरावर येत असलेल्या निसर्गरम्य ढासगड (मोहाडी) येथे वास्तव्याने असलेले सोहम ज्योती दर्शक सतगुरू माउली संत अमरला तवाडे महाराज यांनी दीपस्तंभ सेवाभावी संस्थानच्या माध्यमातून अर्जुुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशयाला अडविण्यात आलेल्या गाढवी नदीच्या उगमस्थानीत कुशीत नैसर्गिक धबधब्याने बहरलेल्या सौंदर्यात भर घालणारे निर्मित देवस्थान हे स्थळ गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळापैकी एक असून, जिल्ह्याच्या विकासात भर घालीत आहे.

या ठिकाणचे दृश्य पाहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातूनच नव्हे तर अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातून पर्यटक, भाविक या स्थळाला भेटी देत आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पर्यटक, भाविक घरातच बंदिस्त झाली होती. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे पर्यटक तथा भाविक मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडून निसर्गाच्या सानिध्याचा आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील दिवसांचे औचित्य साधून ढासगड (मोहाडी) या पर्यटनस्थळाला भेटी देऊन निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत. निसर्गनिर्मित धबधब्यासह भगवान विष्णू, हनुमानजी, शंकरजी, राम लक्ष्मण सीता, दुर्गा माता, व्यासमुनी यांची आकर्षक मंदिरे आणि मनमोहक परिसराची निर्मिती दीपस्तंभ सेवाभावी संस्थानच्या माध्यमातून संत अमररत्न तवाडे महाराज यांनी आपल्या कल्पनेतून साकारली आहेत. या सुंदर देवस्थानाचे दर्शन आणि मनमोहक नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक व भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. या स्थळाचा विकास पूर्णत: सापेक्षरीत्या करण्यात आला आहे. येथील कार्यकारी ट्रस्ट शासन नोंदणीकृत असून, गेल्या वीस वर्षांच्या व्हीजनमधून खूप चांगली कामे करून जिल्ह्याच्या विकासात भर घातली आहे.

........

रस्ते तयार करण्याची गरज

सध्या स्थितीमध्ये या स्थळावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. खडीकरण झाले आहे. थोड्याच दिवसात सिमेंट रस्ता होईल अशी अपेक्षा अमररत्न संत तवाडे महाराज यांनी लोकमतजवळ व्यक्त केली आहे. त्यांच्या अपेक्षेला निश्चितच यश येईल ह्यात शंका नाही. या ठिकाणी पर्यटक व भाविक दर्शन घेण्यासाठी दिवसभर हजेरी लावत असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक पूजा, अर्चा, साहित्य तथा खाण्याची पदार्थ विकून आपल्या कुटुंबाचा चांगल्याप्रकारे उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती तवाडे महाराजांनी सांगितले.

.............

विकासात वनविभागाची आडकाठी

आध्यात्मिक संस्कार, नैतिक शिक्षण, सुसंस्काराचे केंद्र निर्माण करून मानसिक विकासात्मक प्रकल्प राबविण्याची संकल्पना असल्याचे विचार संत तवाडे महाराज यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यटक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे सामाजिक कार्यकर्ते नानाजी पुडके, पराग पुडके, मुख्याध्यापक वसंत खराबे, चरण चेटुले उपस्थित होते. परंतु येथील विकासाकरिता वनविभागाची आडकाठी येत असल्याची माहिती अमररत्न संत तवाडे महाराज यांनी दिली.