शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनी घेतले जिवंत नागराजाचे दर्शन

By admin | Updated: August 23, 2015 00:11 IST

तिरोडा तालुक्यापासून पूर्व दिशेला १२ कि.मी. अंतरावर खडकी-डोंगरगाव येथे नागपंचमीच्या दिवशी साक्षात पाच जिवंत नागराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

सुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यापासून पूर्व दिशेला १२ कि.मी. अंतरावर खडकी-डोंगरगाव येथे नागपंचमीच्या दिवशी साक्षात पाच जिवंत नागराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील अनेक गावातील भाविकांनी नागराजाचे दर्शन घेतले. प्राप्त महितीनुसार, तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव येथे आंबेतलाव पहाडीवर दगडाच्या फटीत सन १९९९ पासून तीन जिवंत नागराज वास्तवास राहतात. आंबेतलावाच्या पहाडीवर शिवमंदीर बांधण्यात आले. त्याच्या बाजुला दगडाच्या फटीमध्ये तीन जिवंत नागराज वास्तवाला असतात. तेव्हापासून दरवर्षी त्या ठिकाणी नागपंचमी व महाविशवरात्रीला गावाच्यावतीने भजन, कीर्तन, अभिषेक, दहीकाला व महाप्रसादांचे आयोजन केले जाते. सर्वात महत्वाची बाब अशी की, यंदा नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिराच्या बाजुला दगडाच्या फटीत ३ नाग व बाहेर २ नाग जिवंत सर्वांना दर्शन देत होते. त्या सापांजवळ एक बेडूक, दोन विंचू जिवंत होते. साप व बेडूक हे सोबत कधीच एकत्र राहत नाही. साप बेडकाला खाऊन टाकते. पण त्या ठिकाणी हा एक विचित्र प्रकार पहावयास मिळाला.नाग मंदिर समितीच्या वतीने शिवमंदीरात अभिषेक करुन पुजाअर्चना करण्यात आली. त्यावेळी महिला भजन मंडळाच्यावतीने भजन, कीर्तन, दहीकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी सामूहीक कार्यक्रम घेण्यात आले. नागपंचमीच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष जि.प. सदस्य रजनी कुंभरे होत्या. प्रमुख पाहुणे जि.प. सदस्य प्रिती रामटेके, पं.स. सदस्य माया शरणागत, सरपंच गीता गोंडाणे, डोंगरगावचे सरपंच दिलीप बिसेन, पो.पाटील साहेबराव बंसोड, मुन्ना रहांगडाले, शामराव कटरे, आर.झेड. बावणे, उपसरपंच महेंद्र कटरे, अध्यक्ष डॉ.फाल्गुन कटरे, हितेंद्र बावणे, छबीलाल पटले, फरणलाल येळे, गजानन कटरे, अरतलाल सोनेवाने, राघोबा कटरे, शिवप्रसाद पांडे, सोनेवाने व मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ.फाल्गुन कटरे यांनी मांडले. संचालन ईश्वर कटरे तर आभार खेमराज कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजू कटरे, धमेंद्र कटरे, रमेश पटले, विजय बावणे, विचित्र कटरे, संपत पटले, तिलकचंद कटरे, वासुदेव सोनेवाने, योगराज बिसेन, बळीराम कटरे, हनवत कुर्वे, छत्रुग्न पटले, कुंजीलाल रहांगडाले, राजकुमार पटले, योगराज कोडेवते, हौसीलाल पटले व समस्त महिला मंडळ व खडकी, डोंगरगाव येथील गावकऱ्यांनी सहकार्य केले.