शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१० एकरातील धानपीक नष्ट

By admin | Updated: May 12, 2015 01:30 IST

विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया तालुक्याच्या दत्तोरा येथील शेतकऱ्यांचे १० एकरातील धानपीक

विद्युत पुरवठा खंडित : १५ दिवसांपासून शेतकरी त्रस्तगोंदिया : विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे गोंदिया तालुक्याच्या दत्तोरा येथील शेतकऱ्यांचे १० एकरातील धानपीक नष्ट झाले. १२ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपीक वाळले आहे.रावणवाडी विद्युत कार्यालयांतर्गत येणाऱ्या दत्तोरा येथील शेताला पाणी देण्यासाठी शेतपरिसरात असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड आला.परिणामी शेतपिकाला पाणी देता आले नाही. तीव्र उन्हामुळे शेतकऱ्यांचे धानपीक पाण्याअभावी वारले आहे. शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा नसल्याने मागील दहा ते बारा दिवसांपासून शेतकऱ्यांनी लाईनमन गायधने व सहाय्यक अभियंता अनंत प्रसादकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. परंतु लाईनमन फोन बंद ठेवतात तर अभियंता फोन उचलून आज करू उद्या करू असे बोलून टाळतात. हा प्रकार मागील १० ते १२ दिवसांपासून सुरू आहे. शेतीला पाणी न मिळाल्यामुळे दत्तोरा येथील लक्षमी महारवाडे, उमेश महारवाडे, सतीश मेश्राम, मधुकर डोंगरे, बबलू शेंडे यांच्या शेतातील १० एकरातील धानपीक पाण्याअभावी नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी १० दिवसांच्या काळात ५० वेळा अभियंत्याला संपर्क साधला. यात काही वेळा फोन लागला तर काही वेळा त्यांनीही आपला फोन बंद करून ठेवला होता. विद्युत अभावी शेतीला पाणी मिळू शकले नाही व पाण्याअभावी धानपीक नष्ट झाले आहे. ऐन गर्भात असणाऱ्या धानाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)२५ जणांना कनेक्शन दिले नाहीदत्तोरा येथील २५ शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षापासून विद्युत कनेक्शन करीता अर्ज केले. परंतु त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही. मागील चार महिन्यापूर्वी विद्युत वितरण कंपनीने या गावातील शेतातवर विद्युत खांब गाडले. दोन महिन्यापूर्वी वाहिन्या टाकल्या. परंतु शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देण्यात आले नाही.