शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

इच्छा असूनही अनेकांना पर्यटन भ्रमंती अशक्य

By admin | Updated: May 22, 2014 01:12 IST

धकाधकीच्या जीवनात कामाचे टेंशन आणि कुटुंबातील अंतर्गत कलहातून बाहेर पडण्यासाठी

धकाधकीच्या जीवनात कामाचे टेंशन आणि कुटुंबातील अंतर्गत कलहातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण आनंदाचे क्षण शोधत असतात. पर्यटनातून आनंद मिळविण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू असतो. परंतु पर्यटन भ्रमंतीबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक फारसे उत्साही दिसत नाहीत. व्यापारी व नोकरदार वर्गातील लोक वगळले तर बहुतांश लोक पोट भरण्याच्या धडपडीतच व्यस्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले.

जिल्ह्यात अनेक जण गर्भश्रीमंत असले तरी बहुतांश लोक सर्वसामान्य आणि गरीब आहेत. गरीब लोक पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करीत असतात. जेवणाची सोय नाही तर पर्यटनाचा आनंद कसा लुटणार या मानसिकतेत जिल्ह्यातील बहुतांश जनता आहे.

जिल्ह्यातील नागरिकांची पर्यटनाविषयी किती ओढ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. गोंदिया शहरात केलेल्या या सर्वेक्षणात फक्त ५ ते १0 टक्केच लोक वर्षातून एकदा किंवा दोन वेळा पर्यटनाला जातात. या पर्यटन भ्रमंतीला वैयक्तिक किंवा मित्र मैत्रिणींसोबत जाण्यापेक्षा सहकुटुंब पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५0 हजारांपेक्षा अधिक असली तरी वर्षाकाठी फक्त २0 हजार लोकच पर्यटन भ्रमंती करीत असल्याचे नोंद शहरातील ट्रॅव्हल्स एजंटकडून मिळाली. या २0 हजार पर्यटकांमध्ये सर्वाधिक नोकरदार वर्ग तर दुसर्‍या क्रमांकावर व्यापारी वर्ग आहे.

नागझिरा, गायमुख, रामटेक, चांदपूर, गांगुलपारा, मांडोदेवी, नवेगावबांध, प्रतापगड, हाजराफॉल, दरेकसा, बावनथडी प्रकल्प, गोसेखुर्द आदी ठिकाणी जात आहेत. फक्त १0 टक्के लोक पर्यटनाला जात आहेत. कधी कधी पर्यटन भ्रमंतीला जातो म्हणणारे लोक ३0 टक्के तर ४0 टक्के लोक पर्यटन भ्रमंती करीत नसल्याचे सर्वेक्षणात आढळले.

पर्यटनासाठी किती दिवस घालवता, या प्रश्नावर दोन ते तीन दिवस घालविणारे २0 टक्के, आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक वेळासाठी १ टक्के तर ७९ टक्के लोक एक दिवसाचीच पर्यटन भ्रमंती करतात. पर्यटनाला कुणासोबत जाता? या प्रश्नावर ७0 टक्के लोकांनी कुटुंबासह पर्यटन भ्रमंती करीत असल्याचे सांगितले. २0 टक्के मित्र-मैत्रिणीसोबत तर १0 टक्के लोक एकटेच जात असल्याचे सर्वेक्षणात आढळले.