शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील पशुपालक जनावरांच्या गोठ्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

राजेश मुनीश्वर सडक - अर्जुनी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी आहेत. तसेच गटामार्फत पशुपालन करणारे गट आजही आहेत. ...

राजेश मुनीश्वर

सडक - अर्जुनी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी आहेत. तसेच गटामार्फत पशुपालन करणारे गट आजही आहेत. असे असतानाच या गरजू शेतकरी व शेतमजुरांना जनावरांचा गोठा न देता सधन लाभार्थ्यांना गोठा मंजूर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील गरजू लोकांना गायी व म्हशी देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्यांना गोठ्यांची गरज आहे, अशा लाभार्थ्यांना गोठा न मिळता ज्यांच्याकडे पूर्वीचे गोठे आहेत, त्या सधन लाभार्थ्यांना जनावरांचे गोठे देण्यात आले आहेत. मागील १०-१२ वर्षांपासून सौंदड येथील लता राजकुमार ठाकरे यांच्याकडे ५ म्हशी व १५ शेळ्या आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा गोठ्याची मागणी केली. पण त्यांना आजही गोठा मंजूर करण्यात आला नाही. लता ठाकरे यांच्याकडे आधी १० म्हशी होत्या. पण, गोठा नसल्याने त्यांना ५ म्हशी विकाव्या लागल्या. आजघडीला त्यांच्याकडे ५ म्हशी व १५ शेळ्या असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मोडक्या व जीर्ण अवस्थेतील घरात त्यांना राहावे लागत आहे. घर बांधण्याची परिस्थिती नाही, तर जनावरांसाठी गोठा कोठून बांधणार, असा प्रश्न त्यांनी केली. १० वर्षांपासून घरासमोर अंगणात मांडव टाकून त्या म्हशी व शेळ्या बांधतात. शासन अशा गरजू लोकांना गोठा मंजूर न करता पुढाऱ्यांच्या जवळील सधन कार्यकर्त्यांना गोठा मंजूर करवून घेतात. गावात सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना ही योजना द्यायला पाहिजे होती, मात्र तसे होत नसल्याची ओरड आहे.

..............

प्रशासन आमची दखलच घेत नाही

शेती नसल्याने बँक कर्ज देत नाही. २० वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यावेळेस वडिलांनी म्हैस दिली होती. त्या एका म्हशीवरून प्रत्येक वर्षी म्हैस घेऊन सन २०१६ मध्ये माझ्याकडे १० म्हशी होत्या. पण, घरी गोठा नसल्याने दरवर्षी एक-एक म्हैस विकावी लागली. आजघडीला ५ म्हशी व १५ शेळ्या आहेत. शेळ्या व म्हशी मांडवात बांधत आहे. सन २०२०मध्ये पशुसंवर्धन विभागाने पशु मेळावा आयोजित केला. त्यात उत्कृष्ट पशुपालक म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पण, मागील १० वर्षांपासून गोठ्याची मागणी करूनसुद्धा गोठा मंजूर करण्यात आला नाही.

-लता राजकुमार ठाकरे, पशुपालक, सौंदड