शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक जनगणना करणारे मानधनापासून वंचित

By admin | Updated: May 22, 2014 01:15 IST

आर्थिक जनगणनेचे काम करण्यासाठी गोंदिया पंचायत समिती अंतर्गत मानधन तत्वावर ९0 जणांची नियुक्ती करण्यात आली होती.

गोंदिया : आर्थिक जनगणनेचे काम करण्यासाठी गोंदिया पंचायत समिती अंतर्गत मानधन तत्वावर ९0 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना तालुक्यातील ५३९ ब्लॉकची आर्थिक जनगणना करायची होती. तालुक्यातील नागरिकांची आर्थिक जनगणना करणार्‍या त्या ९0 जणांना साडेतीन महिन्यांपासून मानधन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात विस्तार अधिकार्‍याला निलंबित करण्याचा प्रस्ताव खंड विकास अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.

आर्थिक जनगणनेचे सर्वेक्षणाचे काम ९0 तरुण-तरुणींना देण्यात आले होते. प्रत्येक ब्लॉकमागे दीड हजार रुपये मानधन देण्याचे ठरले होते. नियुक्त झालेल्या ९0 तरुण-तरुणींनी दीड महिना अहोरात्र मेहनत करून तालुक्यातील ५३९ ब्लॉकचे सर्वेक्षण केले. य मोबदल्यात आपल्याला पैसे मिळतील या आशेने तरुणांनी स्वत:च्या खिशातून प्रवासाचा खर्च करुन सर्वेक्षण केले. झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी सांख्यीकी बोपचे यांच्याकडे सोपविला. परंतु त्यांनी या सर्वेक्षणाचे नियोजन योग्यरित्या खंड विकास अधिकार्‍यांकडे सादर केले नाही.

यासंदर्भात खंड विकास अधिकारी एस.एल. वालकर यांनी विस्तार अधिकारी बोपचे यांना वारंवार पत्रव्यवहार करुन अहवाल सादर करायला सांगितले. तरी देखील बोपचे यांनी अहवाल सादर केला नाही. परिणामी त्यांच्या बिन पगारी तीन रजा रद्द केल्या आहेत. यावरही बोपचे यांना सुध आली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या खंड विकास अधिकारी वालकर यांनी विस्तार अधिकारी बोपचे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महिन्याभरापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी डि.डी. शिंदे यांच्याकडे पाठविला आहे.

परंतु विस्तार अधिकारी बोपच यांच्यावर अद्याप कसलीही कारवाई न झाल्यामुळे खंड विकास अधिकारी वालकर यांनी त्यांना पंचायत समिती मधून कार्यमुक्त करून जिल्हा परिषदेला पाठविले आहे. सतत बोपचे यांच्या विरोधात मानधनासाठी होत असलेली तक्रार वर आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर न केल्यामुळे त्यांचा प्रभार पंचायत समिती येथील आरोग्य विस्तार अधिकारी रविकर बोदेले यांच्याकडे देण्यात आला आहे. या ९0 तरुणांना तालुक्यातील जनतेचे केलेल्या आर्थिक सर्वेक्षणामुळे आठ लाख आठ हजार ५00 रुपये देण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या आर्थिक सर्वेक्षणाचे काम झाले. तेव्हाच या तरूणांना मानधन देणे अपेक्षित होते. परंतु विस्तार अधिकारी बोपचे यांनी खंडविकास अधिकार्‍यांकडे अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हा सांख्यीकीकडे तालुक्याच्या आर्थिक सर्वेक्षणाची माहिती देता आली नाही.

सदर सर्वेक्षण करणार्‍या तरूणांनी आपल्या मानधनासाठी साडे तिन महिन्यांपासून पंचायत समितीच्या चकरा मारल्या. मात्र विस्तार अधिकारी बोपचे हे त्यांना उद्या या, दोन दिवसाने या असे सांगून वेळकाढू धोरण राबवित होते. एवढय़ावरच ते थांबले नाही तर त्रस्त झालेल्या तरूणांनी मानधनासाठी जोर लावल्यावर तुमचे सर्वेक्षण योग्य नाही असा ठपका त्या तरूणांवर लावून त्यांचे बोलणे बंद करण्याचे कृत्य सुद्धा बोपचे यांनी केले.

यावर मात्र सर्वेक्षण बरोबर झाले नाही तर बोपचे यांनी ते सर्वेक्षण कसे स्विकारले असा प्रश्न सर्वेक्षण करणार्‍या ९0 तरूणांनी केला आहे. एकंदरीत सांख्यीकी विस्तार अधिकारी बोपचे यांच्या चुकीमुळे गोंदिया पंचायत समिती अंतर्गत करण्यात आलेला सर्वेक्षण अहवाल जिल्हा सांख्यीकी विभागाला सादर करता आला नाही. याचे खापर मात्र विस्तार अधिकारी बोपचे यांनी सर्वेक्षणाचे कार्य करणार्‍या त्या ९0 तरूण-तरूणींच्या माथी मढला. एवढय़ावरही ते थांबले नाही तर सर्वेक्षण चुक ीचे असल्याचा आरोपही सर्वेक्षणासाठी मेहनत घेणार्‍या त्या ९0 जणांवर लावला. अशात पडून असलेले मानधन त्वरीत देण्याची मागणी ९0 जणांनी केली आहे.