शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:28 IST

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले.

ठळक मुद्देवडेगाव केंद्रावरील प्रकार : शेतकरी हतबल, संबंधितांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. हा प्रकार येथील खरेदी-विक्री समितीच्या वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केद्रावर घडला. या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.प्राप्त माहितीनुसार, वडेगाव-रेल्वे येथे वडेगाव, कन्हाळगाव व घाटी पळसगाव येथील शेतकºयांचे धान खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावे. खासगी व्यापाºयांना विक्री करू नये असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार खुणे यांनी आपल्या शेतात उत्पादीत धान वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले.सोबतच बिदान या वाणाचे धान आणखी काही शेतकºयांनी नेले. इतर शेतकºयांच्या धानाची मोजणी ग्रेडरने केली. मात्र खुणे यांच्या धानाची मोजणी केली नाही. जिल्हा विपणन अधिकारी व ख.वि.समितीचे व्यवस्थापक सुरेश गंथडे यांनी धान निकृष्ट दर्जाचे आहे, इतरत्र विक्रीची व्यवस्था करा असे खुणे यांना सांगीतले.शेतकºयांची यावर्षी परिस्थिती अत्यंत खराब आहे. अल्पवृष्टी, कीड व वादळाने धान नेस्तनाबूत केले. त्यामुळे धानाचा दर्जा खालावलेला आहे. अस्मानी संकटाने शेतकºयांना दगा दिला. मात्र आता हा धान विक्री होत नसल्याने बळीराजासमोर मोठे सुलतानी संकट उद्भवले आहे. युती सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे म्हटले जाते. मात्र शासकीय धान खरेदी केंद्राकडून धान खरेदी केली जात नाही. शेतकºयांनी आपली कैफीयत मांडायची कुणाकडे हा गंभीर प्रश्न आहे. याच धान खरेदी केंद्रावर काही शेतकºयांचे यापेक्षा निकृष्ट दर्जाचे धान खरेदी करण्यात आले. खरेदीत दुजाभाव केला जात असल्याचा खुणे यांचा आरोप आहे.आधीच जर्जर झालेल्या शेतकºयांनी स्वत:चे पैसे खर्च करून घरापासून अथवा शेतापासून तर धान खरेदी केंद्रापर्यंत वाहतुकीचा खर्च करायचा. नंतर ग्रेडरच्या सांगण्यावरून पैसे खर्च करून पुन्हा घरी परत घेऊन जायचे अथवा नाईलाजास्तव अल्पदरात व्यापाºयाला विकायचे या प्रकारामुळे खुणे यांना मनस्ताप झाला असून त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.धान खरेदी करणाºया संस्थाच शेतकºयांना व्यापाºयाला धान विकण्यासाठी बाध्य करतात असा आरोप खुणे यांनी केला आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी व शासन शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करून दाखवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.ग्रेडरची नियमबाह्य नियुक्तीधान खरेदी केंद्रांवर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील गे्रडरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिसरात उस, कापूस, कांदा, मका व द्राक्षांची लागवड होते. त्यांना धानाचे वाण काय समजणार असा सवाल खुणे यांनी केला आहे. धान खरेदी केंद्रांवर धान उत्पादक परिसरातीलच ग्रेडरची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापक गंथडे यांच्याशी चर्चा केली असता, ग्रेडर कोणत्या परिसरातील आहेत याची आपणास माहिती नसल्याचे सांगीतले. खुणे यांचे धान निकृष्ट दर्जाचे असल्याने अचानक दौºयावर असलेल्या जिल्हा विपणन अधिकाºयांनी खरेदी करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगीतले.