शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

किडंगीपार येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 17, 2015 02:17 IST

किडंगीपार येथे एक वयस्कर व एक शाळकरी मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने ग्रामीण जनतेत डेंग्यूचा ...

आमगाव : किडंगीपार येथे एक वयस्कर व एक शाळकरी मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने ग्रामीण जनतेत डेंग्यूचा आजार असल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे किडंगीपार येथे वैद्यकीय चमूने घराघरात जावून तपासणी मोहीम सुरु केली आहे. पं.स. सभापती हेमलता संजय डोये व पं.स. सदस्य अशोक पटले यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी शंभरकर यांच्यासोबत डेंग्यू आजारासंदर्भात चर्चा केली. सोमवारी १४ सप्टेंबर रोजी किडंगीपार येथील रुकमा काशीराम मेंढे (४५) या महिलेची सायंकाळी अचानक प्रकृती बिघडली. तिच्यावर खासगी उपचार करण्यात आला. मात्र तिचा मृत्यू १५ सप्टेंबर रोजी सकाळी झाला. तिच्या तोंडातून व नाकातून रक्त निघत असल्याचे सांगण्यात आले. १३ सप्टेंबर रोजी मयुरी सुरेश मडावी (११) या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या तोंडातून व नाकातून रक्त निघत होते. १५ सप्टेंबरला सरस्वता मारूती रहिले (४५) या महिलेस ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे भर्ती करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच खासगी रुग्णालयात एक रुग्ण दाखल आहे. गोंदिया येथे तीन रुग्ण उपचाराकरिता हलविण्यात आले आहेत. किडंगीपार येथे ठाणा प्राथमिक केंद्राची चमू रुग्णाची तपासणी करीत आहेत. काही अंशी डेंग्यूचा प्रादुर्भात असल्याचे निदर्शनास आल्याचे समजते. पंचायत समिती सभापती हेमलता डोये, संजय डोये, तिगाव पं.स. सदस्य अशोक पटले यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन या संदर्भात चौकशी करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ उपचार करण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)