शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी

By admin | Updated: January 22, 2017 00:54 IST

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीची दखल घेत यशवंत पंचायत समिती गोरेगावच्या शिक्षण

गोंदिया : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीची दखल घेत यशवंत पंचायत समिती गोरेगावच्या शिक्षण विभागाने १७ जानेवारीला २०१७ ला तालुका तक्रार निवारण सभेचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने पुरोगामी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे व जिल्हा नेते रघुपती अगडे यांच्या नेतृत्वात पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, विस्तार अधिकारी मालाधारी यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सेवापुस्तिका अध्यावत करुन दुय्यम प्रत पुरविणे, प्रसूती रजा, अर्जीत रजा व वैद्यकीय रजा प्रकरणे त्वरित निकाली लावणे, चटोपाध्याय निवड वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला त्वरित पाठविणे, जीपीएफ/डीसीपीएस सेडूलसह चालान सन २००८-०९ जिल्हा परिषदेला पाठविणे, कायमतेचा लाभ संगणक सूट, हिंदी मराठी सूट व पुर्वपरवानगी प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, शालेय पोषण आहार, धान्य पुरवठा त्वरित करणे, केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार सेवाजेष्ठता पदवीधर शिक्षकाला देणे, गणवेषाची अधिकची रक्कम शाळांना त्वरित देणे, अपंग भत्ता, प्रवास भत्ता कपात प्रश्न त्वरित निकाली लावणे या मागण्यांचा समावेश होता. चर्चेअंती सभापती व खंडविकास अधिकारी यांनी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन २० जानेवारीपर्यंत समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. समस्या न सुटल्यास धरणे व मोर्च्याचे आयोजन करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे यांनी दिला आहे. तक्रार निवारण सभेच्या निमित्ताने शिक्षण विभागाचे कोल्हे, हिरापुरे, भेंडारकर, कक्ष अधिकार पी.जी. शहारे, व वित्त विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष मानीक शरणागत, सचिव विजय नेवारे, मार्गदर्शक एल.एफ. गिऱ्हेपुंजे, एन.सी. बिजेवार, पी.के. खोब्रागडे, राजेश लदरे, संघटक दिनेश अंबादे, संजय साखरे, जगणे, शरद सोरते, सेवकराम चौरागडे, राजू चौरागडे, आर.एम. बारेवार, महिलाध्यक्ष संगीता घासले, सचिव उनिता पारधी, तालुका नेते गौरी रायकवार, संघटक बुरडे, पटले, वऱ्हाडे, हरिणखेडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)