शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

तहसीलदाराच्या आदेशाची अवहेलना

By admin | Updated: May 24, 2015 01:39 IST

तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट नं. १८१ ची माहिती मागीतली.

आमगाव : तालुक्यातील धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट नं. १८१ ची माहिती मागीतली. त्यात सदर गट नंबरावर कुणाचे अतिक्रमण आहे की सदर गट सरकारी आहे, अशी २६ नोव्हेंबर २०१४ ला माहिती तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना मागीतली. मात्र संबंधीत जागेचे चौकशीनंतर कागद देण्याचे तोंडी आदेश तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी तसेच संबंधित लिपिक यांना दिले. मात्र अजूनपर्यंत तहसिलदाराच्या आदेशाची अवहेलना करुन संबंधित कर्मचाऱ्यांनी कागदपत्र दिले नाही. धोबीटोला येथील शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांची तिन महिन्यापासून कागदाकरिता पायपीट सुरू असून कागद देण्यास टाळाटाळ होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी रेवा फुलीचंद पारधी यांनी गट नंबर १८१ ची माहिती मागीतली. सदर गट टी.सी.एन. नालीच्या आत आहे. यावर कुणाचे अतिक्रमण आहे का? किंवा सरकारी जमीन आहे याबाबत २६ नोव्हेंबर २०१४ ला मागीतली. ही माहिती ४ डिसेंबर २०१४ ला मागीतली. यावर ४ डिसेंबर २०१४ ला अर्जदाराला १८१ गट मध्ये राधेलाल वट्टी धोबीटोला याचे अतिक्रमण नोंद दाखविण्यात आली. तर नकाशा मात्र गट नं. १८६ चा देण्यात आला. या दोन गटाच्या फरकामुळे विसंगती असल्याने अर्जदार रेवा पारधी यांनी दोन्ही माहिती चुकीची आहे असे निदर्शनास आणून दिले. यावर तहसीलदार राजीव शक्करवार यांनी अर्जदाराला अपील करण्याकरिता सांगितले. यावर १० फेब्रुवारी २०१५ ला अपील सादर करण्यात आली. यावर आदेशान्वये मंडळ अधिकारी कोरे व तलाठी मेश्राम यांना मौका चौकशीचे आदेश तहसीलदाराकडून देण्यात आले. यावर सदर जागा तुमच्या मालकीची आहे असे सांगण्यात आले. त्यावर लेखी मागीतले असता मंडळ अधिकारी कोरे यांनी अर्जदाराला अतिक्रमण आहे असे सांगितले. यावर सदर जागा सरकारी आहे असे सांगून लेखीपत्र तहसीलदार मंडळ निरीक्षक किंवा तलाठी यांच्याकडून देण्यात आला नाही. अर्जदार रेवा फुलीचंद पारधी यांनी सदर प्रकरणाची केस नं.२१२ व गट नं. १८१ ची माहिती मागीतली. मात्र तहसील कार्यालयातील समश्रित लिपिकाकडून केसची फाईल दिसत नाही ते गायब झाल्याचे सांगून कागद व माहिती देण्याचे तहसीलदार कार्यालयातील संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. एकंदरित अर्जदाराला मंडळ अधिकारी कोरे, तलाठी मेश्राम हे सत्य माहिती देत नाही. वेगवेगळी माहिती देऊन वेळकाढूपणा करीत आहेत. सदर मंडळ अधिकारी कोरे व तलाठी मेश्रामवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पारधी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)