शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

फुलांऐवजी ज्ञानाने डोके सजवा

By admin | Updated: September 11, 2015 02:12 IST

वाचनाचा छंद प्रत्येकाला असायला पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात वाचनास अत्यंत महत्व आहे. सर्वांना वाचनाची सवय असावी त्यामुळे ज्ञानात भर पडते.

जि.प.अध्यक्ष मेंढे : बिरसी शाळेत शालेय वाचनालयाचे उद्घाटन गोंदिया : वाचनाचा छंद प्रत्येकाला असायला पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात वाचनास अत्यंत महत्व आहे. सर्वांना वाचनाची सवय असावी त्यामुळे ज्ञानात भर पडते. म्हणून सर्व मुला-मुलींनी फुलांनी डोके सजविण्यापेक्षा ज्ञानाने डोके सजवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित शालेय वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी (दि.९) त्या बोलत होते.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती हेमलता डोेये, उपसभापती ओमप्रकाश मटाले, पंचायत समिती सदस्य लोकेश अग्रवाल, सरपंच राजाराम राऊत, उपसरपंच मुन्नालाल खोब्रागडे, केंद्रप्रमुख डी.एल. गुप्ता, सरपंच पी.के. चौधरी, प्रल्हाद चौधरी, मंगरु अंबुले, बबीता बिसेन उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी, शाळेच्या पारिसराची प्रशंसा केली. स्पर्धात्मक युगाव व विज्ञान युगात वाचनाचे अत्यंत महत्व असल्याचे सांगितले. वाचनामुळे जीवन समृद्ध व सुसंस्कृत होते. म्हणून वाचनाची सवय प्रत्येक विद्यार्थ्यांना असावी असे मत व्यक्त केले. तसेच शाळेने विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी सुरू केलेल्या वाचनालयाच्या उपक्रमाची प्रशंसा केली. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनीही शाळेच्या या आगळ््यावेगळ््या उपक्रमाची प्रशंसा करीत आपले मत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक एल.यु. खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेत शाळेबद्दल सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपल्या वेळात वाचनाचा लाभ कसा घेता यावा म्हणून शालेय वाचनालय उघडण्याचा विचार पुढे ठेवून हे पाऊल सर्व शिक्षकांच्या सहमतीने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संचालन शाळेच्या शिक्षिका वर्षा बावनथडे यांनी केले. आभार विकास लंजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिता मानकर, गितेश्वरी रिनाईत, मुनेश्वरी पारधी, ममता पटले, धनवंता पटले, सुषमा सोनवाने, उर्मिला बावनथडे, नरेश पटले, देवचंद सोनवाने, रामेश्वर पटले, वंदना नागरिकर, वच्छला उईके, आशा भावे, उईके, लता टेंभुर्णीकर, सुरेखा पंधरे, दिगंबर पटले, दिवाकर सोनवाने, प्रल्हाद पटले, नारायण अग्रवाल, टी.बी. बोपचे तसेच गावकरी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)