शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2017 00:10 IST

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या महिलेवर बालाजी नर्सिंग होम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

कुटुुंबीयांचा आरोप : केएमजे हॉस्पिटलमधील आठवड्यातील दुसरी घटना लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या महिलेवर बालाजी नर्सिंग होम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान तिची प्रकृती बिघडल्याने पुन्हा बालाजी नर्सिंग होम येथे तिला दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती आटोक्याबाहेर असल्याचे सांगून बालाजी नर्सिंग होम येथील डॉक्टरांनी तिला केएमजे नर्सिंग होम येथे हलविण्याचा सल्ला दिला. केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१५) दुपारी १२ वाजताची आहे. मुस्कान योगेश समुद्रे (३१) रा. गोंदिया असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेवरुन केएमजे रुग्णालयात मृताच्या कुटुंबीयांनी चांगलाच संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे केएमजे नर्सिंग होमचे मुख्य डॉक्टर जायस्वाल यांनी सदर महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास चक्क नाकारले. यावरुन सदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप करण्यात आला आहे. सविस्तर असे की, मुस्कान योगेश समुद्रे या महिलेला दोन अपत्य असल्यामुळे १२ मे रोजी बालाजी नर्सिंग होममध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. दोन दिवसानंतर मुस्कानला नर्सिंग होममधून सुट्टी देण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पोटात दुखने सुरु झाल्याने तिला पुन्हा बालाजी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यातच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने बालाजी नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी तिला केएमजे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यावरुन कुटुंबीयांनी वेळ वाया न घालविता त्वरित मुस्कानला केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान तिचा केएमजे रुग्णालयात मृत्यू झाला. यावर मृताच्या कुटुंबीयांनी केएमजे नर्सिंग होमच्या मुख्य डॉक्टराला मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चक्क नकार दिला. यावरुन रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांना पाचारण करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुस्कान योेगेश समुद्रे या महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांची लापरवाही आणि उपचारादरम्यान झालेली चुकच जबाबदार आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.