शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा झालेल्या हत्या व चोरीचा गुंता सुटणार

By admin | Updated: August 27, 2015 01:59 IST

येथील कापगते कॉम्प्लेक्सजवळील व्यापाऱ्याच्या घरात दिड महिन्यापूर्वी भरदिवसा घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी रात्री ...

दोन आरोपींना अटक : बहुचर्चित नीतू पशिने हत्या प्रकरणअर्जुनी-मोरगाव : येथील कापगते कॉम्प्लेक्सजवळील व्यापाऱ्याच्या घरात दिड महिन्यापूर्वी भरदिवसा घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली. या आरोपींना बुधवारी स्थानिक दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गूढ होत गेलेल्या या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. ही जाणीवपूर्वक केलेली हत्या आहे, की चोरीतून झालेली हत्या, याबाबत नागरिकांमध्ये असलेल्या चर्चेला आरोपींच्या कबुलीजबाबातून पूर्णविराम मिळणार आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक व्यापारी सुरेश पशिने यांच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्यांची पत्नी नीतू यांची ९ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. नेहमी वर्दळ असलेल्या कापगते कॉम्प्लेक्सजवळील त्यांच्या घरी भरदिवसा झालेल्या हत्येचे आव्हान अर्जुनी मोरगाव पोलिसांसमोर होते. तपासाला दिशा मिळावी म्हणून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने काही अंतरापर्यंतचा मार्ग दाखविला होता. परंतू पोलिसांना त्यातून फारसे काही हाती लागले नाही. या प्रकरणाने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती.या हत्येच्या तपासासाठी सीआयडी, स्थानिक गुन्हे शाखा, याशिवाय स्थानिक पोलिसांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली. आरोपींनी कसलेही पुरावे न सोडल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले होते. अखेर तब्बल ४८ दिवसानंतर आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रन्नावरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहा. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, राजेश गज्जल, उपनिरीक्षक साळुंके, सहा. उपनिरीक्षक नवखरे, लुटे, थेर, शिंदे, मेहर, गिरी, मुळे, बिल्लोरे, फुलबांधे यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)भंडाऱ्यात अटक, नावांबाबाबत गुप्तताज्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली त्याच आरोपींनी काही दिवसांपूर्वी भंडारा येथील एका महिलेची हत्या करून दोघांना जबर दुखापत केल्याचे समजते. आरोपींनी नीतू पशिने यांच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपासकामी व्यत्यय येऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपींच्या नावाबद्दल गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे या तपासामध्ये बऱ्याच बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तूर्तास या हत्येचा छडा लागल्यामुळे पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.