शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मुलामुलींच्या लग्नाच्या दिवशी वडील कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 00:44 IST

स्वत:च्या मुलामुलींच्या लग्नाच्या दिवशी आपण कामावर असल्याचे पित्याने दाखवून स्वत:वरच ओढावून घेतले आहे.

इलमे यांचे कृत्य : गुन्हा दाखल करण्याची मागणीकाचेवानी : स्वत:च्या मुलामुलींच्या लग्नाच्या दिवशी आपण कामावर असल्याचे पित्याने दाखवून स्वत:वरच ओढावून घेतले आहे. सदर माहिती माहितीचा अधिकाराखाली मागितलेल्या माहितीच्या अर्जामुळे बाहेर आली. सदर कृषी सहायक एन.एस. इलमे हे गोरेगाव तालुक्याच्या चोपा मंडळात कार्यरत आहे. कृषी सहायक नाना इलमे यांच्या करडी येथील मुला व मुलीचे लग्न १८ ते २५ एप्रिलदरम्यान होते. या दरम्यान सहा दिवस तिरोडा तालुक्यातील भोंबुळी, खुरकुडी व सरांडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात कामे दाखविण्यात आले आहेत. दोन दिवस बोटे आणि गोेरेगाव येथे दाखविण्यात आले आहेत.साडे तीन महिन्यात काम केल्याची दैनंदिनी देण्यात आली. त्यात अनेक चुका असून मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक चोपा यांनी या दैनंदिनीला पारित केले. कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी मे २०१५ मध्ये तिरोडा तालुक्यात १० दिवस दाखविले. यात तीन दिवस तिरोडा तालुका कृषी कार्यालयात तांत्रीक काम दाखविले. उरलेल्या सात दिवसात शेतकऱ्यांची कामे यंत्र धारकांना समजावणे, खात्याचे मोजमाप करणे, आदी कामे केल्याचे दाखविण्यात आले आहे.जून २०१५ मध्ये १२ दिवस तिरोड्यात असायला पाहिजे. कारण तालुका कृषी अधिकारी गोरेगाव यांचे पत्र क्र. ६३३ दिनांक १२ जून २०१५ नुसार कृषी सहायक नाना एस. इलमे हे प्रतिनियुक्ती ठिकाणी कार्यरत होते. पत्र मिळताच याच दिवशी १२ जूनला कृषी सहायक नाना इलमे यांनी तालुका कृषी अधिकारी गोरेगाव यांना तिरोडा तालुक्यातून १२ जूनला मध्यान्ह्यापूर्वी सोडून पदस्थापनेसाठी कायम स्वरुपी रुजू झाल्याचे पत्र दिले. एन.एस. इलमे हे १३ जूनला तिरोडा कार्यालयात आल्याचे दिसून येते. परंतु हा दौरा दाखविण्यात आला हे सुद्धा चुकीचे असल्याचे कृषी विभाग तिरोडाचे म्हणणे आहे. जून महिन्यात मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांना प्रति नियुक्तीवर आलेल्या कृषी सहायकाला कार्यमुक्त आले का अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा तालुका कृषी कार्यालयातून कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. याचाच अर्थ कृषी सहायक नाना इलमे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने आपल्या मर्जीॅचे मालक आहेत. (वार्ताहर)दैनंदिनी मंजूर केली कशी ?मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक शासनाचे किती कर्मशील नोकर आहेत हे कृषी सहायकाच्या दैनंदिनाला मंजूर करुन स्वाक्षरी केली आहे. त्यांनी एलटीसीचे आदेश दिले नाही. कृषी सहायक इलमे यांच्या घरच्या लग्नासभारंभात उपस्थित राहिले. तरीपण हे अधिकारी कामावर असल्याच्या ठिकाणी खोट्या दैनंदिनीवर स्वाक्षरी करुन मंजूर करतात किती नवलाची बाब आहे.दैनंदिनीवरुन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची, कृषी विभागाची व अधिकाऱ्यांची फसवणूक केल्यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.