शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

दिवस निघून गेल्यावर आली मजीप्राला जाग

By admin | Updated: September 6, 2014 02:05 IST

महाराष्ट्र प्राधीकरणच्या लेटलतीफ कारभाराने शहरवासी अगोदरच त्रस्त आहेत. अशात मजीप्राने आपल्या लेटलतिफीचे आणखी एक कृत्य पुढे केले आहे.

गोंदिया : महाराष्ट्र प्राधीकरणच्या लेटलतीफ कारभाराने शहरवासी अगोदरच त्रस्त आहेत. अशात मजीप्राने आपल्या लेटलतिफीचे आणखी एक कृत्य पुढे केले आहे. दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मजीप्राने एक दिवस निघून गेल्यावर वृत्तपत्रांना दिली. यातून मजीप्राला उशीरा जाग आल्याचे दिसून येते. मजीप्राच्या या कृत्यामुळे मात्र शहरातील नळ कनेक्शन धारकांची तारांबळ उडाली. शहरातील नगर परिषद कार्यालयाजवळील पाणी टंकीच्या वॉल्वची दुरूस्ती करावयाची असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे ठरविले. यासाठी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तर ६ सप्टेंबर रोजी सकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मजीप्राने ४ सप्टेंबर किंवा त्यापूर्वी शहरातील नळ कनेक्शन धारकांना सुचीत करणे गरजेचे होते. मात्र आपल्या लेटलतीफ कारभाराचा परिचय देत मजीप्राने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी पत्रकं दिले. पत्रकातील सुचना बातमी रूपात ६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार याबाबत मजीप्राला माहिती नसावी अशी कल्पना यातून येते. मजीप्राच्या या कारभारामुळे मात्र शहरवासीयांची चांगलीच तांराबळ ुउडणार यात काही शंका नाही. तर या कृत्यातून मात्र मजीप्राला उशीरा जाग आल्याचे दिसून आले. त्यातही विशेष म्हणजे ज्या विभागाच्या नावातच महाराष्ट्राचा उल्लेख आहे. त्या विभागाचे पत्रक मात्र अर्धे हिंदी व अर्धे मराठी भाषेत तयार करण्यात आले होते. यातून या विभागातील अधिकारी आपण कोणत्या राज्यात काम करीत आहोत याचाही भान ठेवत नसल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)