शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

‘जंक फूड’चे प्रस्थ धोक्याचे

By admin | Updated: June 3, 2015 01:18 IST

पारंपरिक आहाराला मागे सोडत काहीतरी वेगळे खाण्याच्या नादात लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

गोंदिया : पारंपरिक आहाराला मागे सोडत काहीतरी वेगळे खाण्याच्या नादात लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आज विवाह समारंभात चायनीज पदार्थ असलेल्या स्टॉलवर गर्दी पहायला मिळते. महानगरात असलेले हे फॅड आता ग्रामीण भागापर्यंत पोहचले असल्याचे दिसते. विद्यार्थी शाळेत आणत असलेल्या डब्यातही जंक फूड देण्याचा आग्रह पालकांकडे करीत असल्याची तक्र ार ऐकायला मिळते. परंतु हे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. या पदार्थांचे सेवन केल्याने मुलांची शारीरिक वाढही खुंटते. याला आळा घालण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बर्गर, मॅगी, न्यूडल्स, पिझ्झा, चिज, चिप्स असे जंक फूड डब्यात देऊ नये, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या जंक फूडमध्ये रसायनांमुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. यामध्ये असलेल्या मसाल्यांमुळे अ‍ॅसीडीटी होणे, पोट दुखणे, चिडचिड होणे असे प्रकार वाढीस लागत असल्याचे वैद्यकीय संशोधन अहवालात नमुद केले आहे. शाळेतही पाल्यांना याप्रकारचे पदार्थ डब्यात देऊ नये अशा सूचना पालकांना दिल्या जात आहे. मात्र मुलांच्या आग्रहास्तव जंक फूड डब्यात असतेच. शहरातही जंक फूड पदार्थांची विक्री होत असलेल्या दुकांनामध्ये गर्दी पहायला मिळते. पूर्वी चाटची दुकाने व ठोले बघावयास मिळत होते. आता मात्र जंक फुड कॉर्नर त्यांची जागा घेत आहे. विशेष म्हणजे या दुकानांत तरूण मुले-मुलीच काय महिलांचीही चांगलीच गर्दी दिसून येते. यावरून या पदार्थांची क्र ेझ लक्षात येते. आज एखाद्या चिमुकल्याला गुपचूप विचारल्यास त्याला ओळखता येणार नाही. मात्र पिझ्झा व नूडल्स अलगद ओळखणार अशी स्थिती आहे. यामुळेच अनेक घरातील महिला मंडळी आपल्या बालकांना त्यांचे आवडते जंक फूड डब्याला देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरातले हे पदार्थ आता ग्रामीण भागात पोहचले आहेत. त्यामुळे एखाद्या गावातील व्यक्तीला पिझ्झा व नूडल्स खाताना बघितल्यास आश्चर्य वाटायला नको. (शहर प्रतिनिधी)