शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव/डेपोच्या ‘त्या’ आरोग्य उपकेंद्राची वाताहत

By admin | Updated: August 18, 2014 23:35 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव/डेपो येथील उपकेंद्रच पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.

सडक/अर्जुनी : प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव/डेपो येथील उपकेंद्रच पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. डोंगरगाव/डेपो येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत फारच जुनी आहे. या इमारतीच्या चारही बाजूंनी भेगा पडल्या आहेत. उपकेंद्राला एक मोठी लोखंडी ग्रील लावली आहे. पण मुख्य स्लॅब खाली वाकल्यामुळे ती ग्रील लावता येत नाही. ती ग्रील उघडीच ठेवून त्या उपकेंद्रात राहणाऱ्या मीना कुंभरे या आरोग्य सेविकेला जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहेत. मुख्य म्हणजे हे उपकेंद्र गावाच्या बाहेर असल्यामुळे सेविकेला त्या इमारतीत राहणे भीतीदायक झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीचे भिंतीचे प्लास्टरसुध्दा पाण्याने खाली पडत असल्याचे दिसत आहे. या उपकेंद्राचे दारे व खिडक्यांचे तावदाने पाण्यामुळे सडल्या आहेत. त्यासुद्धा एकदिवस पडू शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या १० वर्षांपासून या उपकेंद्राची एकदाही दुरूस्ती करण्यात आली नसल्याची माहिती पुढे येत आहे. सदर उपकेंद्राची डागडुजी करण्यासंबधी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देवून समस्या दूर केली पाहिजे. पण लहान कर्मचाऱ्यांकडे कुणीही लक्ष दिल्या जात नसल्याची खंत डोंगरगावचे सरपंच पुरूषोत्तम मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. सदर उपकेंद्राची समस्येबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकाऱ्यांना महिती असूनसुध्दा त्यांनीही लक्ष दिले नाही. गेल्या आठ दिवसांपूर्वी नव्याने रूजू झालेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डुंबरे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी डोंगरगाववासीयांनी केली आहे.पडक्या उपकेंद्रात राहून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे आता कठीण झाले आहे. संबंधित वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या उपकेंद्राची स्लॅब फुटल्यामुळे ठिक-ठिकाणावरून पाणी नेहमीत गळत असते. त्यामुळे येथे औषधोपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना व त्यांच्या नातलगांना मोठाच त्रास होतो. (शहर प्रतिनिधी)