शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील वर्गखोल्यांवर वक्रदृष्टी

By admin | Updated: July 16, 2016 02:08 IST

नगर परिषदेच्या शाळांना पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. अशात या शाळांना पूनर्जिवीत करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.

विविध कामांसाठी वर्गखोल्यांची मागणी : आमसभेत प्रस्ताव झाला पारित कपिल केकत  गोंदिया नगर परिषदेच्या शाळांना पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. अशात या शाळांना पूनर्जिवीत करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र नगर परिषदेत मरणासन्न या शाळांवरच काहींची वक्रदृष्टी असून शाळांमधील वर्गखोल्यांवरच डल्ला मारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यातून नगर परिषदेच्या या शाळांचे भवितव्य काय हा प्रश्न पडतो. नगर परिषदेच्या आजघडीला १७ प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थिती काही चांगली नाही. विद्यार्थ्यांअभावी पालिकेच्या या शाळा ओस पडल्या असून यातील काही शाळांचे समायोजन करण्याच्या विचारात खुद्द पालिका आहे. एका खाजगी शाळेची संख्या असावी एवढी संख्या पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयाची आहे. नगर परिषदेकडून पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याने विद्यार्थी व पालक पालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यासाठी पालिका प्रशासन व शिक्षक हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. पालिका प्रशासनाला शाळांना विद्यार्थ्यांनी भरून काढण्यासाठी काही वेगळे करावे यासाठी वेळ नाही. तर शिक्षकांचे फक्त पगारापुरतेच शाळांशी नाते असल्याचेही आता शहरवासी शाळांची गत बघून बोलू लागले आहेत. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेचे सदस्यही आता या शाळांच्या जीवावर उठले आहेत. त्याचे असे की, सदस्यांकडूनच शाळांतील वर्गखोल्या मंडळांना देण्याचे प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आले आहे. कुणी गरजूंना रोजगार निर्मिती प्रशिक्षणासाठी तर कुणी क्रीडा मंडळांना वर्गखोल्या देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला असून त्यावर ठराव घेण्यात आला आहे. आज एक-दोन वर्ग खोल्या देण्यात आल्या तर उद्या जाऊन अन्य कुणी आणखी खोल्यांची मागणी करणार. आज रित्या पडून असलेल्या या शाळा विद्यार्थ्यांनी भरून निघाव्या व त्यांचे गतवैभव परतून यावे यासाठी या जबाबदार सदस्यांच्या प्रयत्नांची गरज आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच या शाळांचा कायापालट होणार यात शंका नाही. आर्थिक दृष्टया कमजोर असलेल्यांसाठी नगर परिषदेच्या शाळा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मोफत शिक्षणाची सोय नगर परिषदेच्या या शाळांच्या माध्यमातून होत आहे. मात्र घसरणीची ही कीड या शाळांचा दर्जा खालावत असून खालावलेला दर्जाही यामागचे कारण असू शकते. ते काही असो, मात्र नगर परिषदेच्या शाळा महत्वाच्या आहेत. असे असतानाही या शाळांवर आपली नजर टाकणे योग्य नाही. मात्र शाळेच्या वर्गखोल्या मागून या महोदयांनी थेट विद्यार्थ्यांच्या हक्कावरच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. खेदाची बाब म्हणजे त्यांना या प्रयत्नाला अन्य सदस्यांनी आमसभेतून हिरवी झेंडी दिली आहे.