लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात जागतिक कोरोना विषाणूच्या प्रसाराला थांबविण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सोमवारीही (दि.२३) जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे समर्थन देत संपूर्ण तालुक्यात लॉकडाऊन केले.आमगाव शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या कठोर सूचनांचे पालन केले आहे. नागरिक व व्यावसायीकांनी सर्व कामे बंद करुन स्वत:च्या सुरक्षिततेकरिता कौटुंबिक आश्रय घेऊन सार्वजनिक संपर्क थांबविले आहे.तालुक्यातील राज्य सीमा असलेल्या छत्तीसगड व मध्यप्रदेश सिमेवर परराज्यातून येणाºया नागरिकांसाठी आरोग्य नियंत्रक पथक तैनात केले आहे. पोलीस विभागाचे पथकही कर्तव्यावर आहे. यात पर राज्यातून येणाºया नागरिकांना प्राथमिक उपचार करुन त्यांना आरोग्य विषयक सूचना देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद खोब्रागडे व डॉ. तार्मध्वज नागपुरे यांनी दिली.नागरिकांच्या सहभागाने सुव्यवस्था कायमकोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन नागरिक करीत आहे. नागरिकांनी रस्त्यांवर फिरु नये व सुरक्षिततेसाठी घरीच थांबावे.- एस.जी.काळे, पोलीस निरीक्षकप्रशासन सज्जतालुक्यात शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये यासाठी गावपातळीवर अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य व स्वच्छतेकरिता नागरिकांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व सुरक्षीत रहावे.- हसाराम भोयर, तहसीलदार
आमगावात कर्फ्यू कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST
आमगाव शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या कठोर सूचनांचे पालन केले आहे. नागरिक व व्यावसायीकांनी सर्व कामे बंद करुन स्वत:च्या सुरक्षिततेकरिता कौटुंबिक आश्रय घेऊन सार्वजनिक संपर्क थांबविले आहे. तालुक्यातील राज्य सीमा असलेल्या छत्तीसगड व मध्यप्रदेश सिमेवर परराज्यातून येणाºया नागरिकांसाठी आरोग्य नियंत्रक पथक तैनात केले आहे.
आमगावात कर्फ्यू कायम
ठळक मुद्देपरराज्यातून येणाऱ्यांचे प्राथमिक उपचार : राज्य सीमेवर नियंत्रण पथक