शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:55 IST

नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.

ठळक मुद्देकडेकोट बंदोबस्त : मतदारांमध्ये उत्साह, पोलीस प्रशासनाची मेहनत फळाला, भीती झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या मतदारसंघाचा गडचिरोली चिमूर मतदारसंघात समावेश आहे. या मतदार संघात एकूण २६ संवेदनशिल मतदान केंद्राचा समावेश आहे. तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात सुध्दा पाच ते सहा संवेदनशिल मतदान केंद्र आहे.त्यामुळेच या भागात सकाळी ७ वाजता ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान घेण्यात आले. संवेदनशिल मतदान केंद्रामध्ये पिपरीया, दरेकसा, बिजेपार व पिपरीया,रामाटोला, हलबीटोला, गल्लाटोला, बाकलसर्रा, जांभळी, नवाटोला, धनेगाव, दरेकसा, जमाकुडो, वंजारी, टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, कोपालगड, कोसमतर्रा, मानागड, मरकाखांदा, कुलरभट्टी, बिजेपार, पांढरवानी, डोमाटोला, लभाधरणी, गोर्रे, लोहारा, भर्रीटोला या केंद्राचा समावेश आहे.देवरी तालुक्यातील घोनाडी, मंगेझरी, बीजटोला, सर्रेगाव, म्हैसुली ही मतदान केंद्र नक्षलग्रस्त भागात असल्याने गेल्या निवडणुकीत या गावातील नागरिक मतदान करण्यासाठी पुढे आले नव्हते. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सुध्दा नागरिकांमध्ये भीती कायम होती. मात्र यावेळेच्या निवडणुकीत याचा पूर्णपणे अभाव दिसून येत होता. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.विशेष म्हणजे प्रथमच या भागातील मतदार स्वत:हून मतदानासाठी निर्भीडपणे पुढे येते होते. त्यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत भागातील मतदान केंद्रावर ३५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हळूहळू का होईना नक्षलग्रस्त भागातील मतदारांमध्ये नक्षलवाद्यांप्रती भीती कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्णनक्षलग्रस्त भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा गावांमध्ये पोलीस विभागातर्फे मागील तीन महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच गावागावात जाऊन पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करुन व त्यांच्यातील नक्षलवाद्यांची भीती दूर केली. त्यामुळेच यंदा मतदान करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येते होते.त्यामुळे या निवडणुकीत पोलीस विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण दिसून आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019