शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने परिसरातील पिकांचे नुकसान

By admin | Updated: July 29, 2014 23:54 IST

मागे तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी आता सुखावला असून शेताची कामे पूर्ण करण्याकरिता त्यांची लगबग सुरु झाली आहे.

मुंडीकोटा : मागे तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी आता सुखावला असून शेताची कामे पूर्ण करण्याकरिता त्यांची लगबग सुरु झाली आहे. सतत तीन दिवसांपासून पाऊस पडल्याने तलाव, बोड्या, नदी-नाल्यांना पूर आले. नदी व नाल्याकाठावरील धानपिके व नदी नाल्यांना लागून असलेल्या शेतातील धानपीक तीन दिवसांपासून पाण्याखाली दबून राहिले. तसेच शेतात पाणी साचून असल्यामुळे धानपीक सडून नष्ट झाले.तीन दिवसांच्या पावसाने कहर केला. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गाव खेड्यांतील शेतकरी आपल्या शेतात राबतो. त्याचप्रमाणे या परिसरात उद्योगधंदे नसल्याने शेतीवर अवलंबून राहून तो आपला उदरनिर्वाह करतो. बँकेकडून घेतलेले कर्ज व उसनवारीची परतफेड या विचाराने शेतकरी आता चिंतातूर झाला आहे. संततधार पावसाने उसंत न दिल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतात लावलेले धान पुरात वाहून गेले. त्या शेतकऱ्यांनी जेमतेम रोवणी केली होती. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तीन दिवस पुराचे पाणी साचून राहिल्यामुळे पिके सडून नष्ट झाली. यावेळी दुबार धानाची रोवणी करावी करावी? असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. यावेळी पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला दिवस आहे. जोरदार पावसाने सतत हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. पण यावेळी शेतकऱ्यांचा कैवारी कुणीही दिसत नाही. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतात काय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.सतत तीन दिवसांच्या पावसाने मुंडीकोटा परिसरातील काही घरांची पडझड झाली असून अनेक घरे पूर्णत: बाधित झाली आहेत. तर काही घरांच्या भिंती पडलेल्या दिसत आहेत. यामुळे राहण्याकरिता घरे राहली नाहीत. पावसाळ्यात रहावे कुठे? असा प्रश्न यांच्यासमोर उभा आहे. (वार्ताहर)